हे चाललय तरी काय? चिमुरडीवर अत्याचार, दुसरीवर बळजबरीचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

अमरावती जिल्ह्यात चिमुरडी, अल्पवयीन व युवतीशी अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या. या घटनांवरून महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. 

अमरावती : काही केल्या महिलांवरील अत्याचाराचा घटना कमी होताना दिसत नाही आहे. रोज एक ना एक घटना उघडकीस येत आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्‍तात जळीतकांड घडल्यानंतर सर्वत्र रोष व्यक्‍त करण्यात येत होता. मात्र, हा संताप घटनेनंतरच असतो, असे एकंदरीत घडणाऱ्या घडनेवरून दिसून येत आहे. अमरावतील जिल्ह्यातील नांदगावखंडेश्‍वर तालुक्‍यात अल्पवयीन मुलाने दोन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केला तर तिवसा तालुक्‍यात 12 वर्षीय मुलीशी बळजबरीचा प्रयत्न झाला. चांदूरबाजार तालुक्‍यात एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका 20 वर्षीय युवतीला अश्‍लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिण्यात आली. 

चिमुरडीशी अत्याचार

लोणी ठाण्याच्या हद्दीतील एका गावात आई अंगण झाडत असताना चिमुरडी (वय 2) रडत आली. तिने तुटक्‍या, फुटक्‍या शब्दात आईपुढे घटनाक्रम सांगितला. पालकांनी घटनेनंतर लोणी ठाणे गाठून तक्रार नोंदवली. याप्रकरणी अल्पवयीनाविरुद्ध (वय 17) अत्याचारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. 

जाणून घ्या - अस्थिविसर्जन करून परतताना आठ जणांचा मृत्यू

अल्पवयीन मुलीशी बळजबरी

तिवसा तालुक्‍यात संशयित महेंद्र मधुकर वावरे (वय 30) याने पत्नी सोडून गेल्यामुळे शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला (12) स्वयंपाक करण्यासाठी घरी बोलावून बळजबरीचा प्रयत्न केला. पीडितेच्या तक्रारीवरून तिवसा पोलिसांनी वावरेविरुद्ध विनयभंगासह, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. 

फोटो व्हायरल करण्याची धमकी

चांदूरबाजार तालुक्‍यातील रहिवासी 20 वर्षीय युवती व अक्षय रामकृष्ण वागद्रे (वय 25) हे दोघे एकाच गावात राहत असल्यामुळे मैत्री होती. अक्षय पीडितेचा पाठलाग करून प्रेमाचा प्रस्ताव ठेवत होता. प्रेमाला होकार न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकीही त्याने दिली होती. पीडितेला अनेकदा अक्षयने व्हिडिओ कॉल करून त्याआधारे फोटो तयार केले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याने तिला दिली. त्रास अनावर झाल्याने पीडितेने पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी अक्षय वागद्रेविरुद्ध विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempts to torture the three girls in Amravati