Akola News
Akola News

अकोला-अकोट रस्त्यावर विधानसभेत लक्षवेधी

अकोला : अकोला- अकोट रस्त्याचे बांधकाम रेंगाळले आहे. त्यामुळे वाहनधारकांना होणारा त्रास आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाल्याने त्याविरोधात आमदार रणधीर सावरकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या अकोट येथील आगर व्यवस्थापकाने या रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाविरुद्ध दिलेल्या पत्रावरूनही सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे.


अकोला-अकोट रोडचे काम 2017 मध्ये सुरू झाले होते. आतापर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी बसला डिझेल जास्त लागत आहे. प्रवासाच्या वेळेमध्ये वाढ झाली असून, राष्ट्रीय संपत्तीची हानी होत असल्याचे पत्र आगर व्यवस्थापक अकोट यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. या पत्रासोबतच लोकप्रतिनिधी व वृत्तपत्रांमधूही या समस्यवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यानंतरही बांधकाम विभागाचा गलथानपणा सुरू असल्याबद्दल आमदार रणधीर सावरकर यांनी लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडून शासनाचे लक्ष वेधले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


शासनाच्या एका विभागाचे प्रथमच दुसऱ्या विभागावर दोषारोप
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच शासनाच्या एका विभागाने दुसऱ्या विभागावर लोकहितार्थ प्रश्नावर दोषारोप करणारे पत्र लिहले आहे. त्याची प्रत प्रशासन व लोकप्रतिनिधींना दिली आहे. हा रस्त्या संदर्भात आ. रणधीर सावरकर यांनी अनेकदा सूचना दिल्यावर सुद्धा बांधकाम विभागाचे लक्ष नसल्याबाबत त्यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून खंत व्यक्त केली आहे.

‘सकाळ’नेही वेधले होते समस्यकडे लक्ष
अकोला-अकोट रस्त्याने आणखी वर्षभर तरी नागरिकांना धुळ खातच प्रवास करावा लागणार असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने 26 फेब्रुवारीच्या अंकात प्रकाशित करून या समस्यकडे लक्ष वेधले होते. त्यापूर्वीही अनेक वेळा अकोला-अकोट रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे ‘सकाळ’ने मांडले होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com