कोरोनामध्ये हा म्हणतो... डोंट फियर आय एम इज हियर!

auto akola.jpg
auto akola.jpg
Updated on

अकोला  : जिल्ह्यात सर्वत्र कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. आपत्तीच्या या काळात आजच्या घडीला कुणालाही दुसऱ्यांसाठी वेळ नाही. सर्व जण आपापल्या कामात व्यस्त आहे. मी आणि माझे कुटुंब अशी सर्वांची धारणा झाली आहे. परंतु अकोल्यातील एक रुग्णसेवक कोरोनाच्या या काळात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सर्वोपचार रुग्णालयासह जिल्हा महिला रुग्णालयात ने-आण करण्यासाठी दिवस, रात्र उपलब्ध आहे. रस्त्यावर ऑटो चालवण्यास बंदी असल्यानंतर सुद्धा हा रुग्णसेवक रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांच्या घरून ने-आण करत त्यांना धीर देत आहे व त्याच्या कडे येणाऱ्याला घाबरता कशाला... मी आहे ना! (डोंट फियर आय एम इज हियर) असे म्हणत मोफत ऑटोची सेवा देत आहे. त्या रुग्णसेवकाचे नाव आहे नासीर खान शेर खान. 

जिल्ह्यात कोरोनाचे संकट घोंघावत आहे. विषाणूच्या या संकटात दुसऱ्यांच्या मदतीची अपेक्षा न बाळगता नागरिक आपापल्या परीने आपले काम करत आहेत. परंतु, आजच्या स्वार्थी जगातही आपुलकी दाखविणारे काही व्यक्‍ती जिवंत आहेत. त्यांच्यामुळेच माणुसकी टिकली आहे. त्यामध्ये ऑटोरिक्षा चालक नासीर खान शेर खान यांचा समावेश आहे. नासीर खान यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असून, ऑटोरिक्षा चालवून ते उदरनिर्वाह करतात. अकोट फैल परिसरातील पूर पिडीत कॉलनी येथे ते राहतात. कोरोनाच्या या काळात ते दुसऱ्यांना मदत करीत असल्यामुळे सर्वोपचार, लेडी हार्डिंग (महिला रुग्णालय) रुग्णालयात सर्वत्र परिचित झाले आहेत.

लॉकडाउनच्या या काळात दिवसाच्या संचारबंदीसह रात्रीच्या गडद अंधारात शहरात ज्यावेळी एकही वाहन उपलब्ध होत नाही, त्याचवेळी रुग्णांच्या सेवेसाठी नासीर खान धावून येतात. कुठलाही मोबदला न घेता ते गरीब, गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सर्वोपचार रुग्णालयातून घरापर्यंत सोडून देण्याचे काम करत आहेत. क्वारंटाईनमधून सुटका झालेल्या रुग्णांना सुद्धा ते आपल्या ऑटोतून त्यांच्या घरापर्यंत पोहचवत आहेत. 

रुग्ण व गरजूंचा सारथी
नासीर खान प्रत्येक दिवशी सकाळीच घरातून निघतात. सर्वोपचार किंवा लेडी हार्डिंगमध्ये पोहचल्यानंतर गरजू रुग्णांना मोफत त्यांच्या घरापर्यंत पोहचवून देतात. कोणी मोबदला दिला तर ठिक नाहीतर या काळात भाडे न मागण्याचे त्यांनी ठरविले आहे. त्यांच्या या रुग्ण समाजसेवेची दखल घेत विशेष जिल्हा शाखेच्या पोलिस निरीक्षकांनी त्यांना अत्यावश्‍यक सेवेसाठी पास सुद्धा दिला आहे. त्यामुळे नासीर खान यांना संचारबंदीच्या काळात रुग्णसेवा करण्यास कमी अडचणी येत आहेत. 

अन्नधान्य वाटपात सुद्धा सहकार्य
लॉकडाउनच्या या काळात गरिबांना मदतीचा ओघ सुरू आहे. परंतु वाहतुकीचे साधन उपलब्ध नसल्याने मदत करणाऱ्यांसमोर अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेवून नासीर खान त्यांच्या ऑटोमध्ये गरिबांना अन्नधान्य वाटप करणाऱ्यांना वाहतुकीची सुविधा सुद्धा उपलब्ध करुन देत आहेत. त्याबदल्यात कोणत्याच प्रकारचा मोबदला ते घेत नाहीत. 

अठरा विश्‍वे दारिद्र्य
नासीर खान यांचा उदरनिर्वाह ऑटोवरच अवलंबून आहे. त्यामुळे ऑटोची चाके फिरतील तितकीच त्यांना मजूरी मिळते. परिस्थिती जेमतेम असल्यानंतर सुद्धा ते रुग्णांना सेवा देत आहेत. घरी विद्युत कनेक्शन नाही, दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था नाही. अतिशय गंभीर स्थिती असल्यानंतर सुद्धा ते आपली सेवा अविरत सुरू ठेवत आहेत. 

रुग्णांचे प्राण वाचविल्याचे समाधान
मी अनेक वर्षांपासून रुग्णसेवा करत आहे. कोरोनाच्या या काळात अनेक गंभीर आजाराच्या रुग्णांना मी सर्वोपचार, लेडी हार्डिंगमध्ये घेवून जात आहे. त्यासोबतच त्यांना घरी सुद्धा सोडत आहे. यादरम्यान अनेक रुग्णांचे प्राण वाचवले. यातून समाधान मिळत आहे. रुग्णसेवा हीच ईश्‍वर सेवा असल्याने त्यातून मिळणारे समाधान वेगळे आहे. 
- नासीर खान शेर खान 
ऑटोरिक्षा चालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com