
टी १ सी २ या बछड्याला डिसेंबर २०१८ मध्ये जेरबंद केले होते. त्यानंतर वन विभागाच्या आदेशानुसार अवनी टी १ या वाघिणीला व्यावसायिक शिकाऱ्याकडून ठार मारण्यात आले होते. त्यावरून रणकंदन माजले होते. यवतमाळ जिल्ह्यातील पांढऱकवडा आणि राळेगाव तालुक्यातील १३ व्यक्तींवर हल्ला करून ठार मारल्यामुळे हा निर्णय वन विभागाने घेतला होता.
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील पिंजऱ्यात बंदिस्त असलेल्या अवनी वाघिणीच्या बछड्याला (टी १ सी २) राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) तांत्रिक समितीने अधिवासात मुक्त करण्यासाठी तत्त्वतः मान्यता दिली आहे. पांढरकवडा वन विभागात नोव्हेंबर २०१८ मध्ये अवनी या वाघिणीला ठार मारण्यात आले होते. त्यामुळे तिचे दोन्ही बछडे आईपासून दुरावले होते. त्यापैकी एका बछड्याला वन विभागाने जेरबंद करून पेंचमधील पिंजऱ्यात ठेवले होते.
एनटीसीएच्या तांत्रिक समितीचे सदस्य सचिव एस. पी. यादव यांच्या उपस्थितीत याबाबत बैठक झाली होती. त्यात समितीने अवनीच्या बछड्याला अधिवासात मुक्ततेला हिरवा कंदील दाखविल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी सांगितले.
जाणून घ्या - पोलिसांनी चक्क शेतकर्यांच वेश धारण करून केला जंगलात प्रवेश; पुढे आले हे वास्तव
मात्र, अद्यापही बैठकीची टिपणी वन विभागाला प्राप्त झालेली नसली तरी ती प्राप्त होताच बछड्याला मुक्त करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. या बछड्याला जंगलात सोडण्यापूर्वीच पेंच प्रकल्पातील पाच हेक्टरमध्ये उभारलेल्या पिंजऱ्यात सांबर, चितळ आणि रानडुकराची शिकार करण्याचे प्रशिक्षण दिलेले आहे.
या काळात मानवाशी त्याचा सबंध येणार नाही याचीही दक्षता घेण्यात आली. एनटीसीएच्या समितीने त्या प्रशिक्षणावर समाधान व्यक्त केले आहे. बछड्याला नवेगाव-नागझिरा, पेंच व्याघ्र प्रकल्प आणि गडचिरोली जिल्ह्यात सोडण्याचा विचार सुरू आहे. अद्यापही त्याबद्दल निर्णय झालेला नसला तरी पेच व्याघ्र प्रकल्पाला पहिला पसंती दिली जाण्याची शक्यता असून हिवाळ्यातच ही प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - हृदयद्रावक! बेपत्ता सव्वा महिन्याच्या बाळाचा मृतदेहच घरच्या विहिरीत तरंगताना आढळला
टी १ सी २ या बछड्याला डिसेंबर २०१८ मध्ये जेरबंद केले होते. त्यानंतर वन विभागाच्या आदेशानुसार अवनी टी १ या वाघिणीला व्यावसायिक शिकाऱ्याकडून ठार मारण्यात आले होते. त्यावरून रणकंदन माजले होते. यवतमाळ जिल्ह्यातील पांढऱकवडा आणि राळेगाव तालुक्यातील १३ व्यक्तींवर हल्ला करून ठार मारल्यामुळे हा निर्णय वन विभागाने घेतला होता.
अवनीच्या दुसरा बछडा (मेल) टी १ सी १ जेरबंद करण्यासाठी वन विभागाने अनेक प्रयत्न केले. मात्र, यश मिळाले नाही. टी १ सी २ या वाघिणीच्या बछड्याची जंगलात मुक्तता करताना रेडिओ कॉलर लावून तिचा सतत मागोवा घेतला जाणार आहे. वन विभागात तिला स्थिरावण्यासाठी काही काळ लागणार असून वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी ती सक्षम आहे की नाही याचीही पाहणी यावेळी करण्यात येणार आहे.
संपादन - नीलेश डाखोरे