

दारव्हा (जि. यवतमाळ) : तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या नायक पोलिस शिपायाला भरती करून घेण्यास रुग्णालय प्रशासनाने टाळाटाळ केल्याचा प्रकार येथील उपजिल्हा रुग्णालयात घडला. या प्रकाराविषयी सदर शिपायाने पोलिस ठाण्यात तशी रितसर नोंद केली आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी उदयसिंह चंदेल यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या नायक पोलिस शिपाई सचिन राऊत यांना बुधवारी रुग्णालय प्रशासनाने आपण कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे कळविले. त्यावरून हा शिपाई गुरुवारी सकाळी साडेसात वाजता श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपजिल्हा रुग्णालयात दाखल होण्यासाठी गेला होता.
यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉ. खडसे यांनी ट्रामा केअर युनिट साडेदहा वाजता उघडण्यात येणार असल्याचे सांगून भरती करून घेतले नाही. त्यानंतर सदर पोलिस कर्मचाऱ्याने साडेआठ वाजता येथील पोलिस ठाण्यात रितसर तशी नोंद केली आहे. या पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याच्या संपर्कात त्या कार्यालयातील आणखी चार पोलिस कर्मचारी आले असून त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. रुग्णालय प्रशासनाबाबत सदर पोलिस शिपायाने संताप व्यक्त केला आहे.
रुग्णालय म्हणते आरोप चुकीचे
गुरुवारी सकाळी पॉझिटिव्ह रुग्ण उपजिल्हा रुग्णालयामध्ये माझ्या कॅबिनमध्ये आला. मी पॉझिटिव्ह रुग्ण आहे, असे तो म्हणाला. त्यावेळी मी त्यांना या उपजिल्हा रुग्णालय इमारतीमध्ये कोविड रुग्ण भरती केले जात नाहीत. बाजूला असलेल्या ट्रामा केअर इमारतीमध्ये कोविड रुग्ण भरती आहेत. तेथे तुम्हाला भरती केले जाईल. तेव्हा तुम्ही इकडे-तिकडे न फिरता ट्रामा केअर मध्ये जा. मी तुमच्या मागे आलोच, असे सांगितले.
त्यानंतर काही सेकंदात ट्रामा केअर सेंटर गेलो व त्यांचा शोध घेतला असता संबंधित व्यक्ती ट्रामा केअर सेंटरवरून अवघ्या दहा ते वीस सेकंदात निघून गेली होती. त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असून मी त्यांना भरती करून घेतले नाही, हे त्यांचे म्हणणं बरोबर नसल्याचे स्पष्टीकरण दारव्हा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. खडसे यांनी दै. ‘सकाळ’सोबत बोलताना दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.