tap
tap

जलसंकटापासून वाचण्याची आताच संधी

अकोला : कमी पर्जन्यमान असूनही इस्त्रायलने उत्तम शेती आणि शेतीपूरक उद्योगातून विकास साधला. त्यातुलनेत महाराष्ट्रात मुबलक पाऊस पडतो. परंतु त्याचे योग्य व्यवस्थापन होत नसून, पाण्याच्या अतीवापरामुळे, येथे दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागत आहे. ही स्थिती बदलून येत्या काळात संभाव्य जलसंकट टाळायचे असल्यास, आत्ताच तसे नियोजन करून पावसाचे पाणी वाचविण्यासाठीचे व्यवस्थापन व उपाययोजन करावे लागणार असल्याचे मत, जलतज्ज्ञ डॉ.सुभाष टाले यांनी व्यक्त केले आहे.

जल संकटावरील उपाययोजन
पावसाच्या लहरीपणामुळे पाण्याच्या संकटावरील उपाययोजन करताना विविध पाणी कमतरतेच्या स्थितींचा विचार करावा लागेल. जसे की, जलचक्रातील बदल, मातीचा आच्छादनांचा परिणाम,भुजलाचा वापर, कृषी व्यवस्थापन, कमीत कमी पाण्यात जास्त उत्पादन,बाष्पीभवन कमी करणे,उन्हाळ्यात पाण्याची होणारी हाणी, बदला विरुद्ध सावधानता, कुरणे व वनांची भूमिका, कमी पाणी लागणाऱ्या कामांवर विशेष भर देणे आणि पाणलोट व्यवस्थापन, अशा पद्धतीचा वापर तसेच या नवनवीन पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे इत्यादी उपाययोजन करणे आवश्यक आहे.

30 वर्षात भारताचे अन्नधान्याचे उत्पादन 102 दशलक्ष टन (1973) वरून 200 (1999) दशलक्ष टन झाले. अन्नधान्याची मागणी 2020 पर्यंत 256 लक्षटन असेल. ती पूर्ण करण्यासाठी तेवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होणार आहे. तेव्हा पाण्याची ही आवश्यकता लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी आतापासून पाण्याचा योग्य वापर, बचत व पाणी व्यवस्थाप करावे.
- डॉ. सुभाष टाले, जल व मृद संधारण अभियांत्रिकी विभाग प्रमुख, डॉ.पंदेकृवि, अकोला


शेततळ्याचे व्यवस्थापन अत्यावश्यक
खरीपात शेततळे महत्त्वाची भूमिका पार पाडतात. आॅगस्टमध्ये पाऊस लांबल्याने शेततळ्यांचा चांगला वापर होतो. 30X30 मिटरचे शेततळे 15 एकराला पाणी देऊ शकते. त्यावर 2 ते 2.5 तास आठ स्प्रिंकलर लावली तर 30 मिटर ओलावा काळ्या मातीच्या शेतात होतो. एक हेक्टरला 300 घनमीटर पाणी लागते. मात्र, 30X30 मिटरच्या शेततळ्यात 1972 घनमिटर पाण्याचे व्यवस्थापन होते.

सरीवरंबा पद्धतीतून जलसंवर्धन
चढ उताराच्या शेतात चडाचे एक तास सोडून सरी काढाव्यात. चरांमध्ये काही अंतरावर जोड ठेवल्यास पावसाचे पाणी सरीमध्येच जीरते व चांगल्याप्रकारे ओलावा निर्माण होतो शिवाय, पाणी वाहून न जाता शेतातच मुरल्याने योग्य पद्धतीने जलसंवर्धन होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com