esakal | आदिवासी बांधवांना कोरकू भाषेतून मिळणार कोरोनाचे धडे

बोलून बातमी शोधा

Corona
आदिवासी बांधवांना कोरकू भाषेतून मिळणार कोरोनाचे धडे
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : जिल्ह्यातील मेळघाटचा (melghat) परिसर सध्या कोरोनाचा (corona) हॉटस्पॉट बनलेला आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर नवे रुग्ण चिखलदरा (chikhaldara) व धारणी (dharni) तालुक्‍यात आढळून येत आहेत. आदिवासी बांधवांमध्ये (tribal community) जनजागृती (awareness about corona) करण्यासाठी आता प्रशासनाने कोरकू बोलीभाषेतून स्थानिकांना कोरोनाचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल (collector shailesh nawal) यांनी ही नवीन सुरुवात मेळघाटमध्ये केली आहे. (awareness about corona thourgh korku language to tribal community in melghat of amravati)

हेही वाचा: वादळानं पाळण्यातील बाळ १०० फूट उंच उडालं, आईनं फोडला एकच हंबरडा

अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने येत असून मृत्यूचे प्रमाणदेखील अधिक आहे. मागील काही दिवसांत मेळघाटमध्ये कोरोनाचा नवीन हॉटस्पॉट तयार झालेला आहे. प्रशासनाने पर्यटनस्थळ चिखलदराचे प्रवेशद्वारच बंद केले आहे. याशिवाय अनेक लहानमोठ्या गावांमध्ये बाहेरील नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मात्र, तरीसुद्घा मेळघाटमध्ये कोरोनाबाबत हवी तितकी जागृती दिसत नसल्याने प्रशासनाने आता स्थानिक कार्यकर्ते तसेच स्थानिक शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने कोरकू बोलीभाषेतून प्रबोधनाचा निर्णय घेतला आहे. बाहेरून येणाऱ्या आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांशी स्थानिकांचा सुसंवाद स्थापित होत नाही. हीच अडचण लक्षात घेऊन आदिवासी बांधवांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधून त्यांना कोरोनाचा धोका, कोरोना होण्याची कारणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरणाचे महत्त्व यासर्व बाबी समजावून सांगितल्या जाणार आहेत.

अन्यथा कारवाई

ग्रामीण भाग तसेच नगरपालिका क्षेत्रात संचारबंदीनंतर देखील नागरिक गर्दी करीत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या असून आता अधिक कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.