ठाणेदार पितांबर जाधव यांना संदलचा मान; ९२ वर्षांची परंपरा असलेला बाबा कम्बलपोष यांचा शाही संदल

Baba Kambalposh's sandal with a tradition of 92 years
Baba Kambalposh's sandal with a tradition of 92 years

आर्णी (जि. यवतमाळ) : ९२ वर्षांची परंपरा असलेल्या बाबा कम्बलपोष यांचा संदल डोक्यावर घेण्याचा मान यंदा ठाणेदार पितांबर जाधव यांना मिळाला आहे. इतक्या वर्षांत प्रथमच संदल साध्या पद्धतीने पार पडला.

सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान म्हणून बाबा कम्बलपोष व किसन उर्फ बच्चू बाबा यांचा शाही संदल शनिवारी (ता. पाच) अगदी साध्या पद्धतीने काढण्यात पडला. परंपरेनुसार यावर्षी आर्णी पोलिस ठाण्याचे ठाणेदार पितांबर जाधव यांनी संदल डोक्यावर घेतला. दरवर्षी ५ ते १० फेब्रुवारीदरम्यान येथे भव्य यात्रा भरते. परंतु, यावर्षी जिल्हा प्रशासनाने यात्रेत दुकाने लावण्यास परवानगी नाकारली.

यावर्षी ९२ व्या यात्रेला खंड पडला आहे. बाबा कम्बलपोष दर्गाह ट्रस्टने साध्या पद्धतीने संदलचे आयोजन केले होते. बाबा कम्बलपोष यांचा शाही संदल चारचाकी वाहनावर ठेवून ठाणेदारांच्या बंगल्यापर्यंत नेण्यात आला.  तर बाबा कम्बलपोष बैठकस्थळावरून बाबा कम्बलपोष दर्गाह समाधीस्थळी मोचक्या भाविकांच्या उपस्थितीत संदल चढविण्यात आला.

यावेळी ठाणेदार पितांबर जाधव, सहायक पोलिस निरीक्षक नागेश जायले, पोलिस उपनिरीक्षक गणेश हिरुळकर आदींसह आर्णी पोलिस स्टेशनचे कर्मचारी व भाविक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com