सव्वा महिन्याच्या बाळाच्या खुनाचे रहस्य कायम; कुटुंबीयांनी पित्याला दिली घटनेची माहिती

संतोष ताकपिरे
Thursday, 3 December 2020

पोलिसांनी निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी पुरावे गोळा करणे सुरू केले. कुटुंबातील सदस्यांचे बयाण नोंदविले. शेजाऱ्यांसोबतही तपास अधिकाऱ्यांनी चर्चा केली. परंतु, कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोलिस अद्याप पोहोचलेले नाहीत. घटनेच्या वेळी नवजात बालकाचे वडील अमरावतीत नव्हते.

अमरावती : शहरातील न्यु. प्रभात कॉलनीत चार दिवसांपूर्वी सवा महिन्याच्या बाळाचा मृतदेह विहिरीत आढळला होता. त्याच्या खुनाचे रहस्य अद्यापही  कायम आहे. चिमुकल्याचा पित्याला कुटुंबीयांनी घटनेची माहिती दिली. ते बिहार येथून अमरावतीत पोहोचतील. त्यांचेही बयाण राजापेठ पोलिस नोंदवतील, असे पोलिस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनी सांगितले.

रविवारी (ता. ३०) घरात बाळाची आई बाथरुममध्ये गेली होती. महिलेचा भाऊ हॉलमध्ये टीव्ही बघत होता. तीस सेकंदात महिला बाथरुमधून खोलीत परत येते आणि नवजात बालक बेपत्ता झाल्याचे बघून हंबरडा फोडले. सर्वत्र बघूनही बाळ सापडला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर तपास सुरू केला. मात्र, बाळाचा काही पत्ता लागत नव्हता. अठरा तासांनंतर त्याच घरातील विहिरीत नवजात बालकाचा मृतदेह सापडला. नवजातच मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागारात पाठविला.

जाणून घ्या - पोलिसांनी चक्क शेतकर्‍यांच वेश धारण करून केला जंगलात प्रवेश; पुढे आले हे वास्तव

महिलेचे वडील, काका व जावई पोलिस कर्मचारी आहेत. त्या कुटुंबात ही घटना घडली. त्या कुटुंबात जवळचे तिघे पोलिस कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांनीही घटना कशी घडली. घटनेच्या वेळी घरात असलेली बाळाची आई आणि तिचा भाऊ या दोघांकडेच चौकशी केली. घटनेच्या काही तासांपूर्वी घरकाम करणारी मोलकरीण किरकोळ कामासाठी येऊन गेली होती. घटनेनंतर पोलिसांची तिचीही चौकशी केली. परंतु, त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही.

त्यानंतर पोलिसांनी निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी पुरावे गोळा करणे सुरू केले. कुटुंबातील सदस्यांचे बयाण नोंदविले. शेजाऱ्यांसोबतही तपास अधिकाऱ्यांनी चर्चा केली. परंतु, कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोलिस अद्याप पोहोचलेले नाहीत. घटनेच्या वेळी नवजात बालकाचे वडील अमरावतीत नव्हते.

अचानक नवजात बालक घराच्या बेडरूमधून तीस ते पस्तीस सेकंदात बेपत्ता झाला आणि दुसऱ्याच दिवशी अठरा तासांनंतर मृतदेह घराच्या आवारातील विहिरीतच आढळला. याबाबी पोलिसांच्या तपासाला अद्यापही निश्‍चित दिशा देऊ शकलेल्या नाहीत.

हेही वाचा - हृदयद्रावक! बेपत्ता सव्वा महिन्याच्या बाळाचा मृतदेहच घरच्या विहिरीत तरंगताना आढळला

पुरावे संकलित करण्याची प्रक्रिया सुरू
प्राथमिक शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यात शवविच्छेदनाच्या चोवीस तासांपूर्वी बाळाचा मृत्यू झाल्याचे कारण नमुद केले. पुरावे संकलित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- किशोर शेळके,
सहायक पोलिस निरीक्षक, राजापेठ ठाणे

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police will also take statement of father in baby murder case