
अमरावती, ता. २५ ः शेतकरी तसेच सर्वसामान्यांच्या विविध समस्यांसाठी आपण सुरू केलेले आंदोलन व जिल्हा बॅंकेमार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक लाभदायी योजना सुरू केल्याने विरोधक व शासनाच्या पोटात शूळ उठला आहे. आपल्याला अध्यक्षपदावरून हटविण्यासाठी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी म्हणजेच विरोधकांनी शासनासोबत हातमिळवणी केली आहे, असा आरोप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी आज केला. यावेळी उपाध्यक्ष अभिजित ढेपे व सत्ताधारी गटातील संचालक उपस्थित होते.