Loan Recovery Dispute: फायनान्स कंपन्यांच्या मनमानीवर कडूंचा हातोडा! कर्जवसुलीसाठी घराला लावलेले कुलूप तोडले; वसुलीदारांना गावबंदी करण्याचे आवाहन

Bachchu Kadu Finance Company Action: यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात कर्जवसुलीसाठी घराला कुलूप लावल्याच्या कथित प्रकारावर आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली. देऊरवाडी येथे त्यांनी हातोड्याने कुलूप तोडून पत्रे कुटुंबीयांना घरात प्रवेश मिळवून दिला.
Bachchu Kadu breaks the lock on a house in Deurwadi following a loan recovery dispute.

Bachchu Kadu breaks the lock on a house in Deurwadi following a loan recovery dispute.

esakal

Updated on: 

आर्णी, : दुष्काळाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले, मजुरांच्या हाताला काम नाही आणि सामान्य कुटुंबांचा उदरनिर्वाहही कठीण झाला आहे. अशा संकटाच्या काळात कर्जवसुलीसाठी थेट घरालाच कुलूप लावून कुटुंबाला बेघर करण्याच्या कथित प्रकारावर शिवसेनेचे विदर्भ नेते आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली.

आर्णी तालुक्यातील देऊरवाडी (बुटले) येथे फायनान्स कंपनीने लावलेले कुलूप त्यांनी स्वतः हातोड्याने तोडले. कुटुंबाला पुन्हा घरात प्रवेश मिळवून दिला.

Loading content, please wait...