
यवतमाळ : राज्यात धार्मिक, जातीय मुद्दे पुढे करून शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना बगल देण्यात येत आहे. राज आणि उद्धव ठाकरे मराठी, हिंदू म्हणून एकत्र येत असतील तर मराठा-ओबीसी म्हणून शेतकरी, शेतमजूर म्हणून देखील एकत्र यायला पाहिजे. अशी भूमिका ‘प्रहार’चे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मांडली.