बच्चू कडू यांचा शिवसेनेला पाठिंबा 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 October 2019

अमरावती : विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच निवडून आलेल्या अपक्ष आमदारांनी आता आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या प्रहार पक्षाचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्यासह शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला असून दुसरीकडे बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी भाजपला पाठिंबा देत आपल्यासोबत आणखी पाच अपक्ष आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सरकारमध्ये काही महत्त्वाची पद मिळण्याच्या दृष्टीने या आमदारांनी लॉबिंग केल्याचे बोलल्या जात आहे. 

बच्चू कडू यांनी प्रहार या त्यांच्या संघटनेच्या जोरावर यंदा अचलपूर मतदारसंघातून चौथ्यांदा निवडणूक जिंकली. यासोबतच या वेळी त्यांनी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांना प्रहारची उमेदवारी दिली होती. श्री. पटेल यांनी विक्रमी मतांनी ही निवडणूक जिंकल्याने बच्चू कडू यांचे जिल्ह्यात बळ वाढले आहे. विशेष म्हणजे, बच्चू कडू यांच्याविरुद्ध अचलपूर मतदारसंघात शिवसेनेच्या सुनीता फिसके यांनी निवडणूक लढविली होती. 
दरम्यान, गेल्या पाच वर्षांपासून भाजपसोबत राहणाऱ्या बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी याच मतदारसंघातून या वेळी हॅट्ट्रिक साधली. त्यांनी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली. यासोबतच चार ते पाच अपक्ष आमदार सोबत असल्याचा दावासुद्धा त्यांनी केला आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी नेहमीच साथ दिली आहे. त्यांच्या रूपाने चांगले मुख्यमंत्री आपल्याला मिळाले. त्यामुळे त्यांच्यासाठी युद्धपातळीवर माझे प्रयत्न सुरू आहेत. पाच ते सहा अपक्ष आमदार माझ्या संपर्कात असून आम्ही मुख्यमंत्र्यांना बळ देऊ, असे आमदार रवी राणा यांनी सांगितले. 

कोणाला मिळणार मंत्रिपद? 
अमरावती जिल्ह्यात भाजपचे चारही आमदार निवडणुकीत पराभूत झाले. धामणगावरेल्वे मतदारसंघातून प्रताप अडसड विजयी झाले व त्यांनी भाजपची प्रतिष्ठा राखली. बच्चू कडू यांनी शिवसेनेला तर रवी राणा यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे मंत्रिपद कुणाला मिळणार? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bachchu Kadu supports Shiv Sena