Breaking : राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन

टीम ई सकाळ
Friday, 19 February 2021

बच्चू कडू हे त्यांच्या मतदारसंघामध्ये सातत्याने फिरत असतात. तसेच जनतेसोबत थेट संवाद साधत असतात. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामधून ते बरे देखील झाले होते.

नागपूर : राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असून ते सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांनी स्वतःची चाचणी करावी व काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. याबाबत ट्विट करून त्यांनी माहिती दिली. 

हेही वाचा - प्रफुल्ल पटेलांच्या महाविद्यालयाला न्यायालयाचा दणका, एका आठवड्यात ५ कोटी भरण्याचे आदेश

बच्चू कडू हे त्यांच्या मतदारसंघामध्ये सातत्याने फिरत असतात. तसेच जनतेसोबत थेट संवाद साधत असतात. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामधून ते बरे देखील झाले होते. मात्र, आता दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये ते सहभागी झाले होते. तसेच त्यासाठी त्यांनी बाईकवरून अमरावती ते दिल्ली असा प्रवास केला होता. दिल्लीवरून परतल्यानंतर ते त्यांच्या मतदारसंघात फिरून आढावा घेत होते. तसेच अकोल्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील त्यांच्यावर आहे. दरम्यान, अकोला आणि अमरावती या दोन्ही जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण प्रचंड वाढत असून बच्चू कडू स्वतः त्याचा आढावा घेत आहेत. त्यामुळेच त्यांना कोरोनाची लागण झाली असावी, असेही म्हटले जात आहे.

हेही वाचा - कोरोना लस घेण्यात ग्रामिण पोलिस अव्वल; शहर पोलिसांमध्ये मात्र भीती; अल्पप्रतिसादामुळे...

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांचेही अनेक ठिकाणी संवाद यात्रा आणि दौरे होते. तसेच गुरुवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bachhu kadu found corona positive