esakal | अमरावती जिल्हा बँक निवडणूक : बबलू देशमुखांना धक्का, बच्चू कडू विजयी
sakal

बोलून बातमी शोधा

बच्चू कडू

अमरावती जिल्हा बँक निवडणूक : बबलू देशमुखांना धक्का, बच्चू कडू विजयी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (amravati district cooperative bank eelction) संचालक पदाच्या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी सहकार पॅनलमधील महत्वाच्या उमेदवाराला धक्का दिला आहे. माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांचा पराभव करीत बच्चू कडूंनी बँकेत एन्ट्री केली आहे. चांदुर रेल्वे सेवा सहकारी सोसायटीमधून माजी आमदार वीरेंद्र जगताप विजयी झाले.

हेही वाचा: सहा ZP साठी मतदानाला सुरुवात, OBC आरक्षणामुळे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

अमरावती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात सहकार पॅनल असून जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांसह अन्य राजकीय आणि सहकारातील दिग्गजांचा त्या पॅनलमध्ये प्रत्यक्ष उमेदवार म्हणून सहभाग होता. तर त्यांच्याविरुद्ध राज्यमंत्री बच्चू कडू, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनल आहे. परिवर्तन पॅनलमध्ये राज्यमंत्री बच्चू कडू स्वत: उमेदवार होते. त्यांच्यासोबत संजय खोडके, आमदार राजकुमार पटेल, आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यासह सहकारातील दिग्गज मंडळींनी रणांगणात उतरली होती. तर भाजप आमदार प्रताप अडसड, माजी मंत्री भैय्यासाहेब देशमुख सारखे दिगग्जांनी पॅनलचं काम पाहिलं. मंत्र्याच्या आणि आमदारांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक हायव्होल्टेज झाली आहे. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून सध्या मतमोजणी सुरू असून परिवर्तन विरुद्ध सहकार पॅनल मध्ये चुरशीची लढत सुरू आहे.

आमदार प्रकाश भारसाकळे पराभूत -

बच्चू कडू यांनी सहकार पॅनलमधील माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांचा पराभव करित बँकेत एन्ट्री केली आहे. चांदुर रेल्वे सेवा सहकारी सोसायटीमधून माजी आमदार वीरेंद्र जगताप विजयी झाले. तर दर्यापूर सेवासहकारी सोसायटी मधून आमदार प्रकाश पाटील भारसाकळे पराभूत.

loading image
go to top