बाळापुरात बंदच्या पार्श्‍वभूमीवरही भरला बाजार

balapur bajar.jpg
balapur bajar.jpg
Updated on

बाळापूर (जि. अकोला) : ‘कोरोना’ विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आल्यानंतरही बाळापूर शहरात दर शनिवारी भरणारा आठवडी बाजार नेहमी प्रमाणे भरला. ही बाब लक्षात आल्यानंतर तहसीलदारांनी विक्रेत्यांना समज दिली. त्यानंतर दुपारी बाजार ओसरल्याचे पहायला मिळाले. ‘कोरोना’वर मात करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या आजाराची लागण होऊ नये म्हणून देण्यात आलेल्या सूचनांमध्ये पुढील सूचना मिळेपर्यंत आठवडी बाजार भरवू नये असेही म्हटले होते.

हेही वाचा- रिकाम्यांना येथे प्रवेश बंदी; वाचा कोणी घेतलाय हा निर्णय
  
आदेश व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचलाच नाही

भाजी विक्रेत्यांना याबाबत विचारले असता सरकारी आदेशाबाबत आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासन ‘कोरोना’ व्हायरस बाबतीत कुठलाही धोका पत्करायला तयार नाही. त्याच पार्श्वभूमीवर नगर परिषदेचे मुख्यधिकारी गोपीचंद पवार यांनी याबाबतचा आदेश काढत आठवडी बाजार भरू नका, असे सांगितले होते. बाजारामुळे त्या परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता असते. यामुळे हा बाजार भरवू नये असे शासनाने सांगितले होते. मात्र, आपल्यापर्यंत आदेश पोहोचला नसल्याचे कारण सांगत हे भाजी विक्रेते बाजारात त्यांची दुकाने थाटून बसले होते. तहसीलदारांनी समज दिल्यावर बाजार ओसरल्याचे दिसून आले.

नागरिकांनी सहकार्य करावे
न.प.च्यावतीने वारंवार सूचना दिल्या आहेत. शासनाचे प्रयत्न सुरूच आहेत. आजही ध्वनिक्षेपकाद्वारे जनता कर्फ्यूला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.
-गोपीचंद पवार, मुख्याधिकारी, न.प.बाळापूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com