
सभा सुरू होताच जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुरेश आसोले यांनी काेराेना विषाणूच्या संदर्भात सदस्यांना व उपस्थितांना माहिती दिली. विदेशात थैमान घालणारा सदर रोगाला जागतिक आरोग्य संघटनेने महामारी म्हणून घोषित केले आहे.
अकोला : अनेक लोक एकत्र आल्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाची शक्यता अधिक होत असल्याचे लक्षात घेऊन जिल्हा परिषद अर्थात मिनी मंत्रालयात काम असणाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. सुभाष पवार यांनी शुक्रवारी (ता. 20) स्थायी समितीच्या सभेत दिली. खबरदारीचा उपाय म्हणून दोन पैकी जिल्हा परिषदेचे एक दार सकाळीच बंद करण्यात आले होते. परंतु आता दाेन्ही मुख्य प्रवेश द्वार बंद करण्यात येतील व काम असलेल्यांनाच जिल्हा परिषदेत साेडण्यात येईल, असेही त्यांनी सभागृहात सांगितले.
जिल्हा परिषदेच्या राजश्री छत्रपती शाहू महाराज सभागृहात शुक्रवारी (ता. 20) स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली. सभा सुरू होताच जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुरेश आसोले यांनी काेराेना विषाणूच्या संदर्भात सदस्यांना व उपस्थितांना माहिती दिली. विदेशात थैमान घालणारा सदर रोगाला जागतिक आरोग्य संघटनेने महामारी म्हणून घोषित केले आहे. जगात अनेक नागरिकांचा या विषाणूमुळे मुत्यू झाला आहे.
महत्त्वाची बातमी - विदेशातून आलेल्या आठ नागरिकांचे होम क्वारंटाईन
जिल्ह्यातील या विषाणूच्या रोगग्रस्तांची त्यांनी सभागृहात माहिती दिली त्यासोबतच खबरदारीच्या उपाययोजना सुद्धा सांगितल्या. सभेला अध्यक्षा प्रतीभा भाेजने, उपाध्यक्षा सावित्री राठाेड, सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, मनिषा बाेर्डे, आकाश शिरसाट, पंजाबराव वडाळ, सदस्य तथा वंचित बहुजन आघाडीचे गट नेते ज्ञानेश्वर सुलताने, शिवसेनेचे गट नेते गाेपाल दातकर, कॉंग्रेसचे चंद्रशेखर चिंचाेळकर, गजानन पुंडकर, डाॅ. प्रशांत अढाऊ, सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गाेहाड यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित हाेते.
सभेवरही दिसला कोरोना इफेक्ट