बल्लारपूर: किरकोळ कारणावरून वाढलेल्या वैमनस्याचे रूपांतर थेट चाकू हल्यापर्यंत पोहोचले. ही धक्कादायक घटना बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे घडली. गावातील एका युवतीशी बोलत असल्याच्या संशयातून तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. .या हल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव पवन परशुराम डिवटे (१९, रा. कोठारी) असे आहे. हातावर जखमा झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. कोठारीतील पवन परशुराम डिवटे याची गावातील एका तरुणीशी मैत्री होती. याच कारणावरून गणेश बाबूराव काशेट्टीवार याच्या मनात पवनविषयी राग होता..अभिजीतला विमानतळावरून अधिकाऱ्यांनी अज्ञातस्थळी नेलं, संपर्क होईना; CJPच्या दाव्याने खळबळ, आंदोलनाला परवानगी.यापूर्वीही संबंधित युवतीशी बोलू नये, अशी धमकी देत गणेशने पवनला शिवीगाळ केली होती. १ जून रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास पवन हा कोठारी येथील मुख्य मार्गाने दुचाकीने जात होता. तेव्हाच गणेश काशेट्टीवार हा त्याच्या दोन साथीदारांसह तेथे आला. पवनला युवतीशी बोलण्याच्या कारणावरून जाब विचारत शिवीगाळ व धक्काबुक्की करून धमकावले..त्यानंतर गणेश तेथून निघून गेला. पुढे काही वेळाने गणेशने कैकाडी माता मंदिर चौकात पवनला थांबविले. खिशातून चाकू काढून त्याच्या हातावर वार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही वेळ भितीचे वातावरण निर्माण झाले. हल्ल्यानंतर आरोपी व त्याचे साथीदार घटनास्थळावरून पसार झाले..IND VS PAK: भारताचा पाकिस्तानवर हॉकीत रोमहर्षक विजय; आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश.प्रेमसंबंधाच्या संशयातून झालेल्या या हल्ल्याने गावात संताप व्यक्त होत आहे.याप्रकरणी कोठारी पोलिसांनी गणेश बाबूराव काशेट्टीवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फरार साथीदारांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. घटनेचा तपास ठाणेदार योगेश खरसान यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वेलादी करीत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.