गडचिरोलीत या वस्तूंच्या विक्रीवर बंदी...काय आहे कारण

देसाईगंज : व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना मुक्तिपथ कार्यकर्ते.
देसाईगंज : व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना मुक्तिपथ कार्यकर्ते.

देसाईगंज (जि. गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करणे ही आमची नैतिक जबाबदारी असल्याची भावनाही व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता तंबाखू, खर्रा, नस, गुडाखू, सिगारेट, विडी यासारखे तंबाखूजन्य पदार्थ विकण्यावर राज्यासह जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. ही बंदी यशस्वी करणे आपली नैतिक जबाबदारी असल्याचे लक्षात घेत वडसा येथील व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या विषयासंदर्भात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जेसा मोटवानी, आयलदास टोपनदास, राहुल सतवानी, धीरज परतवानी, प्रकाश उदासी, पंकज धामेजा यांच्यासह इतरही व्यापारी आणि मुक्तिपथ संचालक डॉ. मयूर गुप्ता, तालुका संघटक भारती उपाध्याय उपस्थित होते.

जिल्ह्यात लपून छपून या पदार्थांची विक्री होते. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. ठोक विक्रेत्यांकडून हा माल जिल्ह्यात सर्वत्र पोहोचविला जातो. ही साखळी तोडण्यासाठी आणि जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थ विक्री पूर्णतः थांबविण्याचा निर्णय असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला.

सर्वांनी घ्यावा पुढाकार

डॉ. मयूर गुप्ता यांनी तंबाखू आणि कोरोनाचा सहसंबंध समजावून सांगितला. ते म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा अद्याप समूह संसर्ग झालेला नाही. तो होऊ नये, यासाठी तंबाखू विक्री आणि वापर बंद होणे अत्यावश्‍यक आहे. विकासाच्या दृष्टीने वडसा तालुका जिल्ह्यासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरला आहे. तुम्ही सर्वांनी घेतलेला पुढाकार त्याचेच उदाहरण आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील एकूण विक्रीलाच आळा बसणार आहे. तालुक्‍यातील जास्तीत जास्त दुकानांना यात सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी असोसिएशनला केले.


पुरवठ्याची साखळी तुटणार

वडसा हे जिल्ह्यातील सर्वांत मोठे व्यापारी केंद्र आहे. इतर साहित्यासह तंबाखूजन्य पदार्थाचाही पुरवठा इतर तालुक्‍यात होतो. पण खाद्यपदार्थांसोबत तंबाखूजन्य पदार्थ विकणे हा कायद्याने गुन्हा आहे. वडसा तालुक्‍यातून ठोकमध्ये शेकडो गावांना व शहरातील दुकानदारांना तंबाखूजन्य पदार्थाचा पुरवठा होतो. पण व्यापाऱ्यांच्या या निर्णयामुळे ही साखळी तुटून पुरवठाच खंडित होणार आहे. कोरोना प्रसार रोखण्यासाठीही हे खूप महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com