esakal | 31 मार्चपर्यंत बॅंक विड्रॉल, लोन इन्स्टॉलमेंट बंद
sakal

बोलून बातमी शोधा

bank withdrawal, loan installments closed

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी बॅंकिंग सेवांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याअंतर्गत पैसे काढणे व कर्ज हप्ते भरण्याचे काम वगळता अन्य सर्व सेवा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा सूचना जिल्हा प्रशासनाने बॅंकांना दिल्या आहेत. यासंबंधी बॅंकांना नियमावलीच जारी करण्यात आली आहे. 

31 मार्चपर्यंत बॅंक विड्रॉल, लोन इन्स्टॉलमेंट बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी बॅंकिंग सेवांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याअंतर्गत पैसे काढणे व कर्ज हप्ते भरण्याचे काम वगळता अन्य सर्व सेवा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा सूचना जिल्हा प्रशासनाने बॅंकांना दिल्या आहेत. यासंबंधी बॅंकांना नियमावलीच जारी करण्यात आली आहे. 


कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी सर्वच स्तरावरुन विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमिवर विविध बॅंका, पोस्ट ऑफिस येथे लोकांची होणारी गर्दी तेथील कामकाजाचा भाग म्हणून हाताळले जाणारे पासबुक, चलनी नोटा इत्यादी मुळे संसर्गाच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व बॅंका, पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी, अधिकारी वर्गासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सूचना जारी केल्या आहेत. या सूचना साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये देण्यात आल्या असून त्यांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. सदर आदेशांचे उल्लंघन झाल्यास भारतीय दंड संहिता (1960 चा 45) कलम 188 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या आहेत सूचना

  • पैसे काढणे व कर्ज हप्ते भरणे वगळता इतर सर्व सेवा 31 मार्च पर्यंत बंद ठेवाव्या.
  • पोस्ट ऑफिस, बॅंक, ए.टी.एम. येथे मुख्य प्रवेशद्वाराजवळ गार्ड नेमून काऊंटरवर एका वेळी एकच ग्राहक उपस्थित असेल याची दक्षता घ्यावी. उर्वरित ग्राहकांना किमान तीन फूट लांब अंतरावर थांबवावे.
  • ए.टी.एम. मशिनचे दररोज निर्जंतूकीकरण करावे. बॅंक इमारतीची स्वच्छता करावी.
  • बॅंक, पोस्ट ऑफिसमध्ये येणाऱ्या ग्राहकांचे हात धुण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी.
  • अधिकाधिक ऑनलाईन व्यवहार करण्याबाबत ग्राहकांना प्रेरित करावे.
loading image