तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलांवर अस्वलांचा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bears attack on women who go to collect tendu leaves gadchiroli
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलांवर अस्वलांचा हल्ला

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलांवर अस्वलांचा हल्ला

गडचिरोली : तेंदूपत्ता संकलनाकरिता जंगलात गेलेल्या महिला मजुरांवर अचानक अस्वलांनि हल्ला चढविला असून यात ४ महिला मजूर जखमी झाल्या आहेत. ही घटना शनिवारी (ता. ७) सकाळी ७ वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील दादापूर गावाजवळील जंगल परिसरात घडली. दादापूर येथील महिला-पुरुष अशा १४ जणांचा गट गावापासून ५ किमी अंतरावर असलेल्या जंगलात तेंदूपत्ता संकलनाकरीता गेले होते. संकलनाचे काम सुरू असतानाच अचानक ५ च्या संख्येत असलेल्या अस्वलाच्या कळपाने या मजुरांवर हल्ला चढवला.

या हल्ल्यात सीमा रतिराम टेकाम (वय २१), लता जीवन मडावी (वय ३५), पल्लवी रमेश टेकाम (वय २५) व रमशीला आनंदराव टेकाम (वय ३८) या चार महिला गंभीर जखमी झाल्या. दरम्यान, सहकारी मजूर शेवंता उसेंडी, रेशमा उसेंडी, निलीमा उसेंडी, सनया टेकाम, आनंदराव मडावी, जीवन मडावी, रामचंद्र टेकाम, रतिराम टेकाम, आनंदराव टेकाम यांनी आरडाओरड ऐकताच मदतीला धावून गेले असता अस्वलांच्या कळपाने घटनास्थळावरून पळ काढला. सर्व जखमींना तत्काळ कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. घटनेची माहिती मिळताच रामगडचे वनरक्षक बी. डी. रामपूरकर, मालेवाडाचे वनरक्षक बाबूराव तुलावी, डी. एम. उईके यांनी रुग्णालयाला भेट देत जखमींची विचारपूस केली व नियमाप्रमाणे उपचारार्थ सरकारकडून आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Bears Attack On Women Who Go To Collect Tendu Leaves Gadchiroli

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top