तलाठ्यास मारहाण ;गाडी खाली घेण्याची धमकी

दोघा वाळूमाफियांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल
 crime
crimesakal media

देऊळगावराजा : बेकायदेशीर वाळूचे ट्रॅक्टर कारवाईसाठी पोलिस ठाण्यात घेऊन चला म्हणून सांगणार्‍या तलाठी व मंडळ अधिकार्‍यास लोटपोट करण्यात आली. यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालकासह दोघांविरुद्ध आज (ता.१६)पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

तालुक्यातील खडकपूर्णा नदी पात्रातील वाळू घाट बंद असूनही सर्रास बेकायदेशीर वाळूचे उत्खनन सुरू आहे. परिणामी शासनाच्या महसूलाला वाळू माफियांकडून लाखोंचा चुना लावण्यात येत आहे. डिग्रस येथील तलाठी ज्ञानेश्वर दांडगे, मंडळ अधिकारी प्रेमानंद वानखेडे व कोतवाल भगवान ढोले तिघे देऊळगाव मही ते डिग्रस मार्गावरील गॅस गोडाऊन जवळ थांबले असताना नारायणखेड मार्गाने एक लाल रंगाचा विना नंबर ट्रॅक्टर बेकायदेशीर वाळू भरून येताना दिसले. सदर ट्रॅक्टर अडवून ट्रॅक्टर चालक बाळू मुंडे याला पुढील कारवाईसाठी सदर ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात घेऊन येण्याचे सांगितले असता गणेश विष्णू वाघ हा घटनास्थळी आला व ट्रॅक्टर चालकास धमकावून वाळूने भरलेले ट्रॅक्टर पळवून नेण्यास सांगितले.

यावेळी महसूल कर्मचार्‍यांना लोटपोट करून अश्‍लील भाषेत शिवीगाळ केली एवढेच नव्हे तर गाडीखाली उडवून देईल म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत तलाठी ज्ञानेश्वर हरी दांडगे हल्ली मुक्काम देऊळगाव मही यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गणेश विष्णू वाघ रा. डिग्रस बुद्रूक व बाळू मुंढे रा. नारायणखेड या दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करून अश्‍लील शिवीगाळ करीत लोटपोट केल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मोरे पाटील तपास करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com