सालेकसातील ग्रामीण रुग्णालयात समोर आला धक्कादायक प्रकार; खाटांअभावी रुग्णांवर उघड्यावर उपचार

यशवंत शेंडे 
Tuesday, 12 January 2021

सालेकसा तालुका हा नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल आहे. सालेकसा येथे ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यात आले असून, हे रुग्णालय 30 खाटांचे आहे. सरकारी रुग्णालय असल्याने गोरगरिबांना आशेचे किरण वाटू लागले. मात्र, प्रत्यक्षात या रुग्णालयाची अवस्था फार बिकट आहे. रुग्णांची हेळसांड होत आहे.

सालेकसा (जि. गोंदिया) ः नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयांत खाटांचा अभाव असल्याने रुग्णांवर उघड्यावर उपचार केले जात आहेत. वेळेत औषधोपचार होत नसल्याची ओरडदेखील रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाइकांनी केली आहे. हा प्रकार थांबवावा, अशी मागणी होत आहे.
 
सालेकसा तालुका हा नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल आहे. सालेकसा येथे ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यात आले असून, हे रुग्णालय 30 खाटांचे आहे. सरकारी रुग्णालय असल्याने गोरगरिबांना आशेचे किरण वाटू लागले. मात्र, प्रत्यक्षात या रुग्णालयाची अवस्था फार बिकट आहे. रुग्णांची हेळसांड होत आहे.

जाणून घ्या - काय म्हणावं याला? मृत बाळांच्या घरी पेटल्या नाही चुली अन् सांत्वनासाठी आलेल्या मंत्र्याच्या स्टाफने मारला चिकन-मटणावर ताव

विशेष म्हणजे, कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना पैसे मोजावे लागत आहेत. दवाखान्याच्या अवतीभोवती घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रुग्णांना रात्री खाली उघड्यावर रात्र काढावी लागत आहे. शिवाय रुग्णांना वेळेवर उपचार दिले जात नाही. रुग्णांना शौचालय, स्नानगृह, पट्टी बंधन या खोलीमध्ये रात्र काढावी लागते. 

सरकार नक्षलग्रस्त भागांत निधीची कमतरता भासू देणार नाही, असा ढिंढोरा पिटतो. या भागात आरोग्याच्या सुविधाही उत्तम असतील, असेही सांगतो. मात्र, सालेकसा येथील चित्र काही वेगळेच आहे. आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचेही रुग्णांवर औषधोपचाराकरिता दुर्लक्ष होत आहे. आरोग्य सेविकांचाही हेकेखोरपणा कायम आहे. त्यामुळे रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

नक्की वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

थंडीच्या दिवसांत रुग्णांना रात्र खाली उघड्यावर काढावी लागत असल्याने या रुग्णालयाची कार्यप्रणाली कशी असावी, याचा अंदाज येतो. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन येथील व्यवस्थेत बदल करावा, अशी मागणी होत आहे.          

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beds are not available in Rural hospital of of Salekasa Gondia