esakal | अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांसाठी पुरेसे बेड्स, जम्बो कोविड सेंटरचीही गरज नाही
sakal

बोलून बातमी शोधा

beds are sufficient for corona patients in amravati

अमरावतीकरांना तूर्तास तरी बेड्‌सकरिता संघर्ष करण्याची वेळ येणार नाही. शासकीय तसेच खासगी कोविड सेंटर्सवर प्रशासनाकडून बारीक लक्ष ठेवले जात असून सध्या तरी बेड्‌सचा तुटवडा नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांसाठी पुरेसे बेड्स, जम्बो कोविड सेंटरचीही गरज नाही

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : एकीकडे मुंबई, पुणे, नागपूरसारख्या महानगरांमध्ये कोरोना रुग्णांसाठी बेड्‌स मिळविण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांच्या नाकीनऊ आले आहे, मात्र सुदैवाने अमरावतीमधील परिस्थिती आजही नियंत्रणात आहे. साधे बेड्‌स, ऑक्‍सिजन तसेच व्हेंटीलेटर बेड्‌स पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून एकाचवेळी दोन हजार रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात, असा दावा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केला. त्यामुळे अमरावतीकरांना तूर्तास तरी बेड्‌सकरिता संघर्ष करण्याची वेळ येणार नाही. शासकीय तसेच खासगी कोविड सेंटर्सवर प्रशासनाकडून बारीक लक्ष ठेवले जात असून सध्या तरी बेड्‌सचा तुटवडा नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा - चोर पावलांनी कमी होतो शरीरातील ऑक्सिजन; पन्नाशी ओलांडलेल्या ७० टक्के कोरोना रुग्णांना...

तरुणांनी रक्तदानासाठी पुढे यावे -   
सध्या 45 वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. लस घेतलेले नागरिक पुढील दोन महिने रक्तदान करू शकणार नाही. त्यामुळे 18 ते 43 वयोगटापर्यंतच्या तरुणांनी रक्ताचा तुटवडा पाहता रक्तदानासाठी समोर आले पाहिजे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

अमरावतीत रुग्णसंख्या नियंत्रणात -
महानगरांमध्ये कोरोनाचा मोठा उद्रेक झाला असला तरी अमरावतीमधील रुग्णसंख्या सध्या तरी नियंत्रणात आहे. शासकीय, खासगी कोविड हॉस्पिटल्स, कोविड केअर सेंटर्समध्ये अनेक बेड्‌स रिक्त आहेत. त्यामुळे सध्या तरी जम्बो कोविड सेंटरची आवश्‍यकता नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा - कारमध्ये सापडले सहा पेट्या जिलेटिन; दोघांना अटक, दहशतवादविरोधी पथकाची कारवाई

अमरावतीमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात जरूर आली आहे, मात्र अशा परिस्थितीत नागरिक बेफिकिरीने वागत असतात, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा उद्रेक होतो. मात्र काही दिवसांपासून अमरावतीकरांनी त्रिसूत्रीचा वापर केलेला आहे. नागरिकांनी केलेले प्रयत्न निश्‍चितच प्रशंसनीय आहेत, ते कायम राहिले पाहिजे, असा प्रयत्न जबाबदार अमरावतीकरांनी करावा.
-शैलेश नवाल, जिल्हाधिकारी.  
 

loading image