

Nine Policemen Get Life in Begya Pawar Custodial Death Case
esakal
वाशीम : रिसोड पोलीस ठाण्यातील कोठडीत झालेल्या बेग्या पवार मृत्यूप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत तत्कालीन ठाणेदारासह नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. चोरीच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या पारधी समाजातील बेग्या पवार या युवकाचा ९ मे २०११ रोजी पोलीस कोठडीत मारहाणीमुळे मृत्यू झाल्याप्रकरणी हा निकाल देण्यात आला. राज्याच्या इतिहासात कोठडीतील मृत्यूच्या प्रकरणात एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच घटना मानली जात आहे.