esakal | खबरदार...बियाण्यांचा काळाबाजार केल्यास...
sakal

बोलून बातमी शोधा

cotton seed

लॉकडाउनने खते-बियाण्यांच्या मागणी व पुरवठ्यात मोठी तफावत येण्याची शक्यता आहे. त्यातून काळाबाजाराल उधाण येऊन शेतकऱ्यांची फसवूण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः दर्जाहिन बियाण्यांचा पुरवठा होण्याची अधिक शक्यता आहे

खबरदार...बियाण्यांचा काळाबाजार केल्यास...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन असल्याने यावर्षी खते व बियाण्यांच्या काळाबाजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. ते गृहित धरून तालुका स्तरावर भरारी पथके गठीत करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ही पथके बियाणे व खत विक्री व पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणार आहे.


शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी दरवर्षी भरारी पथकांचे गठण कृषी विभागामार्फत केले जाते. यावर्षी ऐन खरीप हंगामापूर्वी सुरू असलेल्या लॉकडाउनने खते-बियाण्यांच्या मागणी व पुरवठ्यात मोठी तफावत येण्याची शक्यता आहे. त्यातून काळाबाजाराल उधाण येऊन शेतकऱ्यांची फसवूण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः दर्जाहिन बियाण्यांचा पुरवठा होण्याची अधिक शक्यता आहे.त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सातही तालुक्यात भरारी पथके गठित करण्यात आली आहे.


तालुकानिहाय अशी आहेत पथक


अकाेला  : तालुका कृषी अधिकारी डी.एस. प्रधान, कृषी अधिकारी जी. आर. बाेंडे, वजन मापे नरीक्षक गायकवाड, व कृषी अधिकार शलाका सराेदे.


बार्शीटाकळी तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे, कृषी अधिकारी एस.टी. चांदूरकर, ए.एस. हनवते, जी.पी. काळपांडे.


मूर्तिाजापूर  :  तालुका कृषी अधिकारी अमृता काळे, एस.जे. तिजारे, ए.एस. हनवते, एस. जे. बेंडे.


अकाेट : तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे, व्ही.एल. थुल, डी.पी. देवडे व विनय चव्हाण.


तेल्हारा  तालुका कृषी अधिकारी मिलींद वानखडे, बी.जे.चव्हाण, डी.पी. देवडे, एन. व्ही. राठाेड.


बाळापूर : ​ कृषी अधिकारी एन.बी. माने, ए.डी. मुंदडा, गायकवाड व एस.डी. जाधव.


पातूर : ​ कृषी अधिकारी धनंजय शेटे, व्ही. आर. शिंदे, ए.एस. हनवते, ए.पी. देशपांडे.

loading image