विदर्भातील अनेक भागांत वादळीवाऱ्याने थैमान घातले आहे. याचा मोठा फटका नागरिकांना बसला आहे. वादळीवाऱ्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात ५० हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे, तर भंडारा जिल्ह्यात ४५ फूट उंच बौद्ध मूर्ती कोसळली आहे.
भंडारा जिल्ह्यातील पवनी ही नगरी प्राचीन बौद्ध नगरी म्हणून विदर्भात प्रसिद्ध आहे. सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेला पाठवले होते. त्यांच्या प्रवास वर्णनात पवनी शहराचा उल्लेख आहे. चंद्रमणी विहार येथे तथागत गौतम बुद्ध यांचे केस असल्याचे नमूद आहे.