बिअर शॉपीचे नूतनीकरण करून देतो म्हणाला अन् जाळ्यात फसला

bribe
bribe

भंडारा : नियमानुसार बिअर शॉपीचे नूतनीकरण झाले. या कामाची पोच पावती देण्यासाठी एक हजार रुपये लागतील असे सांगणारा उत्पादन शुल्क निरीक्षक चांगलाच गोत्यात सापडला. व्यावसायिकाकडून या कामाचे 1 हजार रुपये स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क, भंडारा येथील अधिकारी व कर्मचारी या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. 

तानाजी शिवाजी कदम (वय 50) असे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकाचे तर किशोर चंदुलाल बिलनवार (वय 45) असे शिपाई कर्मचाऱ्याचे नाव आहे. तक्रारदारांच्या मालकीच्या बिअर शॉपीच्या नूतनीकरणाची पोच पावती दिली. त्याचा मोबदला म्हणून 1 हजार रुपयाची लाच निरीक्षकाने मागितली होती. ही रक्कम शिपायामार्फत स्वीकारताना सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले.

बिअर शॉपीचालकाकडून घेतली 1 हजाराची लाच 
दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली. भंडारा पोलिसात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक रश्‍मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुधलवार, पोलिस उपअधीक्षक श्री चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक योगेश्‍वर पारधी, पोलिस हवालदार संजय कुरंजेकर, पोलिस नायक सचिन हलमारे, आश्‍विन गोस्वामी, पराग राऊत, कुणाल कडव, श्री. धार्मिक यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com