
नागपूर : मेडिकलमध्ये 25 कोटी खर्चून ट्रॉमा केअर युनिट उभारण्यात आले. मात्र, कोरोनाच्या आणीबाणीत ट्रॉमाला "कोविड-19 हॉस्पिटल'मध्ये रूपांतरित करण्यात आले. राज्यभरात मेडिकलच्या कोविड-19 हॉस्पिटलचा नावलौकिक सुरू झाला. मात्र, या कोविड-19 हॉस्पिटलचे नाव मोठे आणि दर्शन खोटे असे काहीसे सुरू असल्याचे समजते. कोविड-19 हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे नमुने (स्वॅब) योग्य त्या "कोल्ड चेन'द्वारे हलवणे आवश्यक आहे. मात्र, कोल्ड चेनच्या देखभालीसाठी आवश्यक उपकरणेच उपलब्ध नाहीत.
रुग्णांना हलवताना ऑक्सिजनची गरज आहे, ते ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध नाही. तसेच उपचारादरम्यान अत्यावश्यक असलेले "एबीजी' यंत्र कार्य करीत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मेडिकलमधील 90 खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर "कोविड हॉस्पिटल'मध्ये रूपांतरित करण्यात आले. 27 एप्रिलपासून मध्य भारतातील हे पहिले कोविड हॉस्पिटल कोरोनाबाधितांच्या सेवेत दाखल झाले.
60 खाटांच्या अतिदक्षता विभागासह स्वतंत्र क्ष-किरण विभाग, स्वतंत्र शस्त्रक्रियागृह, स्वतंत्र प्रयोगशाळा, स्वतंत्र रक्तसाठा केंद्र या कोविड हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. कोरोनाबाधितांवर वरदान ठरत असल्याचा देखावा नजरेसमोर उभा होत असताना येथील उणिवांकडे अद्यापही प्रशासनाचे लक्ष गेले नाही. यामुळे मेडिसीन विभागप्रमुखांनी कोविड-19 हॉस्पिटल (ट्रॉमा केअर)मध्ये तातडीने लक्ष पुरवून सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याकडे 6 मे 2020 रोजी कोविड-19 हॉस्पिटलचा नावलौकिक कायम राहावा, तसेच रुग्णांना दर्जेदार सेवा मिळावी, यादृष्टीने उणिवांचा पाढा पत्रातून वाचला आहे.
रुग्णांचे कोविड नमुने (स्वॅब) कोल्ड चेनद्वारे हलवणे आवश्यक आहे. यामुळे कोल्ड चेनच्या देखभालीसाठी तसेच कोल्ड वेग कायम ठेवणारी उपकरणे कोविड हॉस्पिटलमध्ये नाहीत. याशिवाय रुग्णांचे सॅम्पल सुरक्षित ठेवण्यासाठी फ्रीजदेखील येथे उपलब्ध नाही. आवश्यक असलेल्या काही तपासण्या होत नाहीत. परत असे सॅम्पल बाहेर पाठविण्यासाठी योग्य ती व्यवस्था नाही. या दृष्टीने योग्य ती व्यवस्था तत्काळ करण्यात यावी, असे पत्रातून कळविले आहे.
कोविड हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम ही प्रणाली नाही. भरती असलेल्या रुग्णांचा वारवार ईसीजी करावा लागतो, तरी प्रत्येक वॉर्डामध्ये ईसीजी मशीन तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी, इन्फेक्शन कंट्रोलच्या दृष्टीने डोनीग व डोफिग एरियाचे प्रत्येक शिफ्टनंतर सॅनिटायझेशन होणे आवश्यक असल्याची भावनाही पत्रातून मेडिसीन विभागप्रमुखांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.