तिसरे मंगलाष्टक सुरू झाल्यावर वधू म्हणाली, "तू मला पसंत नाहीस"

bhandara bride suddenly refused to marry
bhandara bride suddenly refused to marry

मोहाडी (जि. भंडारा)  : "मिलन की शुभघडी आयी है", असे म्हणत वर वधूमंडपी पोहचला. आप्तेष्ट, मित्रमंडळी व नातेवाईकांसह मोजकेच पाहुणे मंडपात पोहोचले होते. काही वेळातच मंगलाष्टके सुरू झाली. पाचव्या मंगलाष्टकाची प्रतीक्षा होती. एकमेकांच्या गळ्यात हार घालून दोघेही लग्नबंधनात अडकणार होते. पण ऐनवेळी तिसर्‍या मंगलाष्टकालाच नवरीने मुलगा पसंत नाही म्हणून लग्नाला स्पष्टपणे नकार दिला. तिच्या या पावित्र्यामुळे क्षणभर सारेच अचंबित झाले. वधूपक्षाने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण ती काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. त्यामुळे जड अंतःकरणाने नवरीच्या नकाराचे दुःख मनात ठेवून लग्नाचे वऱ्हाड नवरीविनाच परतले. ही घटना रविवारी (ता. 24) मोहाडी शहरातील शिवाजी चौक वॉर्डात घडली.
 
13 फेब्रुवारीला लग्न ठरले. 24 मे ही लग्नाची तारीख ठरली. वप मोजक्या नातेवाईकांसह वधूमंडपी उपस्थित झाला. रीतीरिवाजाप्रमाणे वराने वधूच्या डोक्यावर अक्षतांच्या मुठी ठेवल्या. परंतु वधूने पहिल्याच मंगलाष्टकापासूनच वराच्या डोक्यावर अक्षतांच्या मुठी ठेवल्या नाही. दोन मंगलाष्टके झाल्यानंतर वधूने मध्येच नवरदेवशी एकट्यात बोलायाचे आहे म्हणून सांगितले. पाहुण्यांसमोरच दोघेही घरात गेले. तेव्हा वधूने "तू मला पसंत नाहीस" म्हणून सांगताच नवरदेवाचे अवसान गळाले. नाईलाजाने वरमंडळींनी नाराजीच्या सूरातच काढता पाय घेतला.

वराने दुसऱ्या दिवशी मुलीचे घर गाठले.  माझ्या मर्जीनेच विवाह थांबविला असून तुम्ही दुसरे लग्न करण्यास मोकळे असल्याचे पंचांसमक्ष लिहून दिले. वधूचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत असले तरी दोघांनीही अंभोरा व पचमढी येथे जाऊन भावी संसाराची स्वप्ने रंगविले होती. वधूच्या या अफलातून कृत्यामुळे वर पक्षाला अपमान व हकनाक बदनामीला सामोरे जावे लागले असून अख्ख्या पंचक्रोशीत या लग्नाविषयी चर्चा सुरू आहे.

अलिकडे प्रत्येक मुलीला आपला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. "पदरी पडले अन् पवित्र झाले" अशी धारणा आता राहिली नाही. आपल्या पसंतीचा मुलगा नसल्यास मुली टोकाची भूमिका घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत. या घटनेतसुद्धा साखरपुडा होण्यापूर्वीच ठामपणे आपले म्हणणे आई वडिलांना सांगायला हवे होते. पण तीने ऐन मंडपात नकार देवून नवर्‍या मुलाचा हिरमोड केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com