esakal | पोलिसाला कोरोनाची लागण झाल्याने भंडाऱ्यात खळबळ, चेकपोस्टवर होता तैनात
sakal

बोलून बातमी शोधा

police

आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९ होती. आज त्यात भर पडली. यात लाखांदूर येथील २९ वर्षीय तरुण,  साकोली तालुक्यातील ३२ वर्षीय व्यक्ती आणि चांदणी चौक भंडारा येथील ४३ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.

पोलिसाला कोरोनाची लागण झाल्याने भंडाऱ्यात खळबळ, चेकपोस्टवर होता तैनात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भंडारा  : कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य बजावताना पोलिस कर्मचारी कोरोना बाधित होत 
असल्याच्या घटना राज्यभरात समोर येत आहेत.  भंडारा जिल्ह्यातसुद्धा आज चेकपोस्टवर नियुक्त असलेला पोलिस कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज जिल्ह्यात चार नवे रुग्ण आढळून आले. यात या पोलिसाचासुद्धा समावेश आहे. 

आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९ होती. आज त्यात भर पडली. यात लाखांदूर येथील २९ वर्षीय तरुण,  साकोली तालुक्यातील ३२ वर्षीय व्यक्ती आणि चांदणी चौक भंडारा येथील ४३ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. हे तिघेही मुंबई व पुणे येथून प्रवास करून जिल्ह्यात दाखल झाले होते. त्यांना विलगीकरणात ठेवले असताना त्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले. 

जंगलात झोपून काढावे लागताहेत दिवस... ऐका नागपुरातील पोलिसाची व्यथा

कर्तव्यावर असलेला पोलिस निघाला पॉझिटिव्ह
दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील जवाहरनगर खरबी नाका येथे चेकपोस्टवर कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. हा पोलिस कर्तव्यावर असताना सहकारी व घरच्या लोकांच्या संपर्कात आल्याने संबंधित व्यक्तींच्या विलगीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. चक्क पोलिसच आता कोरोनाबाधित निघाल्याने पोलिस विभाग व प्रशासकीय यंत्रणेची चिंता वाढली आहे.