अगं खरंच... खेड्यातील तरुणी नव्हे तर 'मॉडेल दिसतेस तू', वाचा संपूर्ण प्रकार...

अगं खरंच... खेड्यातील तरुणी नव्हे तर 'मॉडेल दिसतेस तू', वाचा संपूर्ण प्रकार...

मोहाडी (जि. भंडारा) : झगमगत्या रूपेरी चित्रपटसृष्टीचे आकर्षण सर्वांनाच भुरळ घालते. इथली जीवघेणी स्पर्धा व चढाओढ प्रत्येकाच्या पचनी पडेलच असे नाही. जिथे हायप्रोफाईल तरुणींचा स्ट्रगल संपत नाही, तिथे गावाकडच्या तरुणीचा निभाव लागणे कठीणच. मात्र, अभिजात सौंदर्य, जिद्द आणि महत्त्वाकांक्षेच्या जोरावर "मानसी (श्रुती मदनमोहन येळणे) ही गावातील तरुणी एका म्युझिक कंपनीच्या "मॉडेल दिसतेस तू' या अल्बम सॉंगमध्ये झळकणार आहे. 

पदार्पणातच तिला "मॉडेल दिसतेस तू' या अल्बम सॉंगमध्ये अभिनयाची संधी मिळाली आहे. मोहित गायकवाड (नाशिक) हे अभिनेत्याच्या भूमिकेत आहेत. पाच जूनला या अल्बमचे पोस्टर प्रकाशित झाले. सोमवारी (ता. 8) हा अल्बम रिलीज झाला. युट्यूबवरसुद्धा या गाण्यांचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना घेता येईल.

पैसा, प्रतिष्ठा, ग्लॅमर व नाव कमावण्याच्या लालसेने मॉडेल आणि स्टार होण्यासाठी चित्रपटसृष्टीत अनेकांची धडपड व प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू असते. यात यश मिळेलच असेही नाही. परंतु, आपल्या ध्येयासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना कधीतरी संधी मिळते. अशीच एक संधी मानसी (श्रृतीने) खेचून आणली. 

भंडारा जिल्ह्यातील करडी (ता. मोहाडी) हे तिचे मूळ गाव. बीएस्सीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या श्रुतीला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. गावात तिचे प्राथमिक शिक्षण झाले. शाळेच्या स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमात ती आघाडीवर असायची. पुढील शिक्षण तिने भंडारा व कोंढा येथून पूर्ण केले. शहरात आल्याने तिच्या कला, नृत्य व अभिनयाला संधी मिळाली. काही नृत्य स्पर्धांमध्येसुद्धा ती सहभागी झाली. येथूनच पुढे तिने याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार केला. 

असा झाला प्रवास

बीएस्सीला असतानाच श्रुतीला एका चित्रपटाच्या ऑडीशनबद्दल माहिती मिळाली. घरच्यांशी बोलून ती भावासह हिंगणघाटला पोहोचली. तिथे मंगला थक, प्रकाश चौधरी, संजय भुजाडे यांच्या माध्यमातून नागपूर येथे अभिनयाचे प्रशिक्षण मिळाले. "सुंदर माझे गाव' हा लघुपट तिने साकारला. अंकिता शर्मा, प्रेमाकिरण, भारत गणेशपुरे, वर्षा उसगावकर, वैभव तत्त्ववाणी, समृद्ध पोरे यांच्याशी ओळख झाल्याने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या उद्‌घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. नृत्यप्रशिक्षक किशोर कुंभारे यांच्या माध्यमातून विदर्भस्तरीय फॅशन शोमध्ये पोहोचण्याचा मान मिळाला. 18 नोव्हेंबर 2018 मध्ये रॉयल ऍकॅडमी ऑफ डान्सच्या विदर्भस्तरीय फॅशन शो स्पर्धेत ती पहिली आली होती.

कौटुंबिक पार्श्‍वभूमी

श्रुती घरची परिस्थिती सर्वसाधारण असून, वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत. जोडधंदा म्हणून कापडविक्रीचा व्यवसाय करतात. आई सध्या मुलांच्या शिक्षणासाठी भंडारा शहरात राहते. तीसुद्धा ब्युटीपार्लर व साडीसेंटर चालविते. हस्तकलेच्या वस्तू तयार करून विक्री करते. परंतु, घरच्या लोकांनी तिच्या अभिनय व मॉडेलिंग क्षेत्रात जाण्याची आवड जोपासली. तिला नेहमी प्रोत्साहन दिले. 

प्रत्येक क्षेत्रात संघर्ष हा अटळ 
प्रत्येक क्षेत्रात संघर्ष हा अटळ आहे. मात्र, त्यावर मात करून समोर जाण्याची तुमची तयारी असली पाहिजे. 
- श्रृती येळणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com