Farmer Tarachand Bendwar from Marhegaon in Bhandara District Dies Amid Crop Damage and Financial Distress
esakal
पालांदूर : पीक उत्पादनात सातत्याने होणारी घट आणि आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने शेतालगतच्या करंजीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मऱ्हेगाव (ता. लाखनी) येथे गुरुवारी (ता. १५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. ताराचंद रघुनाथ बेंदवार (रा. मऱ्हेगाव) से मृताचे नाव आहे.