बोंबला, भागवतासाठी आला अन् बायको घेऊन पळाला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

महाराज सोशल मीडियावरसुद्धा तितकाच ऍक्‍टिव्ह होता. फेसबुक, व्हॉट्‌सऍपवर नेहमीच असायचा. त्याच्या गोडबोल्या स्वभावामुळे त्याने गावकऱ्यांशी जवळीक वाढविली होती. गावांत लग्नसोहळा एखाद्या कार्यक्रमाचे निमंत्रण असल्याचा मॅसेज टाकला तरी दिनेशचंद्र महाराज गावात हजेरी लावत होता.

भंडारा : भागवत सप्ताहासाठी आलेल्या महाराजाने चक्क गावातील तरुण विवाहित महिलेला पळवून नेल्याची घटना नजीकच्या मोहदुरा येथे घडली. तीन बायकांचा दादला असणारा हा दिनेशचंद्र मोहतुरे महाराज सावनेर तालुक्‍यातील कुबाडा येथील निवासी आहे. ही घटना विश्‍वासाला तडा देणारी व समाजाच्या घसरलेल्या नितिमत्तेवर प्रकाश टाकणारी आहे.

मोहदुरा येथे 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत दरवर्षीप्रमाणे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. भागवत करण्यासाठी सावनेर तालुक्‍यातील कुबाडा येथील दिनेशचंद्र मोहतुरे या तथाकथित हभप महाराजाला बोलविण्यात आले होते. भागवत सप्ताह आटोपताच दोन दिवसांनी म्हणजे बुधवारी (ता.5) त्याने गावातील एका तरुण विवाहित महिलेसह पलायन केले.

महाराज निघाला तीन जणींचा दादला
विशेष म्हणजे, ही महिलासुद्धा एका पाच वर्षाच्या मुलीची आई आहे. दिनेशचंद्र नामक हा महाराज मागीलवर्षीसुद्धा मोहदुरा येथे भागवत सप्ताह करण्यासाठी आला होता. महाराज अंदाजे 35 च्या वयोगटात आहे. तरुणतुर्क असणाऱ्या महाराजाची देहबोली, गोडगोड बोलण्याने गावकऱ्यांना भुरळ घातली. त्यामुळे त्याला यावेळीसुद्धा भागवत करण्यासाठी बोलविण्यात आले होते.

- शेतकऱ्यांसाठी सरकारची तयारी जोमात; पण साठवणूक करणार कुठे?

पंचक्रोशीत रंगली चर्चा
महाराज सोशल मीडियावरसुद्धा तितकाच ऍक्‍टिव्ह होता. फेसबुक, व्हॉट्‌सऍपवर नेहमीच असायचा. त्याच्या गोडबोल्या स्वभावामुळे त्याने गावकऱ्यांशी जवळीक वाढविली होती. गावांत लग्नसोहळा एखाद्या कार्यक्रमाचे निमंत्रण असल्याचा मॅसेज टाकला तरी दिनेशचंद्र महाराज गावात हजेरी लावत होता. पलायन केलेल्या विवाहितेच्या सासऱ्याशी त्याने चांगलीच जवळीक साधली होती. एकदोन वेळा त्याने त्यांच्या घरी मुक्काम सुद्धा केल्याची माहिती आहे. अशातच त्याने विवाहितेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेतले. अन भागवत सप्ताह संपताच त्याने विवाहितेला घेऊन पळ काढला.

- Video : आता देता येणार जेवण; मात्र प्रकृती धोक्‍याबाहेर नाही

महाराज स्त्रीलंपट
पत्नी घरात नसल्याचे पाहून पती व सासऱ्याने बुधवारी रात्री शोधाशोध सुरू केली. मात्र ती आढळली नाही. यापूर्वी दोघांच्या मोबाईलवरुन झालेल्या संभाषणावरून घरात या प्रकरणाची कुणकूण लागली होती. त्यामुळे दिनेशचंद्र विरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यात आली. शोध घेत पती व कुटुंबीय पोलिसांसह कुबाडा येथे पाहोचले असता महाराज गावी नव्हता. महाराज हा विवाहित असून त्यांच्या स्त्रीलंपटपणामुळे व जाचाला कंटाळून यापूर्वी तीन बायका निघून गेल्याचे समजले.

आपल्या गुरुजींच्या बहिणीवर वाईट नजर ठेवल्याने त्याला हाकलण्यात आल्याचे कुबडावासींनी सांगितले. मोबाईलवर संपर्क केला असता, त्याने आम्ही वृदांवन येथे असल्याचे सांगून महिलेसोबत असल्याचे कबूल केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhandara fraud baba affair with married women