Groom Dies Two Days Before Wedding
esakal
भंडारा : ठाणा येथील नवरदेवाचा बोहल्यावर चढण्यापूर्वीच अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कवडसी फाटा येथे गुरुवारी रात्री घडली ही घटना घडली. दुर्गेश किशोर लांजेवार (वय ३३) असं या मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. येत्या रविवारी (ता. ११) त्याचं लग्न होणार होतं. मात्र, त्यापूर्वी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर आथा हळहळ व्यक्त केली जाते आहे.