Bhandara Hospital Fire News : ही आहेत मृत व बचावलेल्या बाळांच्या मातांची नावे

Bhandara Hospital Fire News Seven baby were moved to safety
Bhandara Hospital Fire News Seven baby were moved to safety

भंडारा : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वॉर्डात लागलेल्या आगीत १७ नवजात शिशूंपैकी दहा शिशूंना आपला जीव गमवावा लागला. वैद्यकीय चमू व अग्निशमन विभागाच्या चमूंना सात बाळांचे जीव वाचवता आले. शनिवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेवर सर्वच स्तरावरून रोष व्यक्त करण्यात येत आहे. बचावलेल्या सातही बाळांना सुरक्षित स्थळी हलविल्याचे समोर आले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वॉर्डात (एसएनसीयू) रात्री उशिरा आग लागली. भंडारा नगर परिषद, सुरक्षा कर्मचारी व पोलिस पथकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासोबतच ती इतरत्र पसरू नये यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आग पूर्णत: विझविण्यात आलेली असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.

मृत बाळांच्या मातांची नावे

आईचे नाव मृतबालक राहणार
हिरकन्या हिरालाल भानारकर मुलगी रा. उसगाव (साकोली)
प्रियंका जयंत बसेशंकर मुलगी रा. जांब (मोहाडी)
योगिता विकेश धुळसे मुलगा रा. श्रीनगर पहेला (भंडारा)
सुषमा पंढरी भंडारी मुलगी रा. मोरगाव अर्जुनी (गोंदिया)
गीता विश्वनाथ बेहरे मुलगी रा. भोजापूर (भंडारा)
दुर्गा विशाल रहांगडाले मुलगी रा. टाकला (मोहाडी)
सुकेशनी धर्मपाल आगरे मुलगी रा. उसरला (मोहाडी)
कविता बारेलाल कुंभारे मुलगी रा. सितेसारा आलेसूर (तुमसर)
वंदना मोहन सिडाम मुलगी रा. रावणवाडी (भंडारा)
अज्ञात मुलगा -


बचावलेल्या बाळांच्या मातांची नावे

आईचे नाव मृतबालक
शामकला शेंडे मुलगी
दीक्षा दिनेश खंडाते मुलगी (जुळे)
अंजना युवराज भोंडे मुलगी
चेतना चाचेरे मुलगी
करिश्मा कन्हय्या मेश्राम मुलगी
सोनू मनोज मारबते मुलगी

संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नऊ शिशूंचे मृतदेह संबंधित नातेवाईकांकडे सोपविण्यात आले आहेत. तसेत बचावलेल्या मुलांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. या बालकांमध्ये एका जुळ्यांचा समावेश आहे. बालकांच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीसंदर्भातील प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्तीव्यवस्थपन प्राधिकरणाचे अध्यक्ष संदीप कदम यांनी सादर केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com