भंडारा : लाखनी नगरपंचायतवर राष्ट्रवादीचा कब्जा; भाजप दुसऱ्या स्थानी

Lakhni Nagar Panchayat Election
Lakhni Nagar Panchayat ElectionLakhni Nagar Panchayat Election

लाखनी (जि. भंडारा) : नगरपंचायत निवडणुकीत (Lakhni Nagar Panchayat Election) आठ जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने (Nationalist Congress Party) आपले वर्चस्व सिद्ध केले. भारतीय जनता पक्षाला सहा जागांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेस तिसऱ्या स्थानी राहिली. एकूण १७ प्रभागांसाठी दोन टप्प्यांत पार पडलेली लाखनी नगरपंचायतची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. मंगळवारी पुढे आलेल्या निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने आठ जागांवर विजय मिळवला. भारतीय जनता पक्ष सहा जागा मिळवत द्वितीय स्थान प्राप्त केले. तर काँग्रेसला केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला.

भाजपला बंडखोरी भोवली

भाजप (BJP) ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष कोमल गभने यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी प्रभाग क्र. ४ मध्ये बंडखोरी केली. तसेच भारतीय जनता लाखनी विचार मंचच्या बॅनरखाली एकूण ९ प्रभागांमध्ये उमेदवार दिले. त्यापैकी ७ जागांवर भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला.

Lakhni Nagar Panchayat Election
...तरीही ते केंद्रात मंत्री कसे होतात; पाटील यांचा पवारांना टोला

माजी नगराध्यक्षांचा पराभव

माजी नगराध्यक्ष कल्पना भिवगडे यांना भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांनी प्रभाग क्र. १२ मधून अपक्ष निवडणूक लढविली. या प्रभागात अत्यंत चुरशीच्या लढतीत कॉंग्रेस (Congress) आणि अपक्षाला धोबीपछाड देत भाजपच्या (BJP) संदीप भांडारकर यांनी दणदणीत विजय मिळवला. तर प्रभाग क्र. १३ मधून माजी नगराध्यक्ष ज्योती निखाडे यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळवला.

  • राष्ट्रवादी काँग्रेस : ८

  • काँग्रेस : २

  • भाजप : ६

  • अपक्ष : १

  • एकूण : १७

Lakhni Nagar Panchayat Election
धक्कादायक! पत्नी, दोन मुलांचा गळा चिरून खून; पतीने केली आत्महत्या

विजयी उमेदवार

  • प्रभाग क्र. १ - विपुल कांबळे (काँग्रेस)

  • प्रभाग क्र. २ - कांता निर्वाण (राष्ट्रवादी)

  • प्रभाग क्र. ३ - राजेश निंबेकर (राष्ट्रवादी)

  • प्रभाग क्र. ४ - विभा अशोक हजारे (राष्ट्रवादी)

  • प्रभाग क्र. ५ महेश आखरे (भाजप)

  • प्रभाग क्र. ६ - सारिका बसेशंकर (भाजप)

  • प्रभाग क्र. ७ - त्रिवेणी पोहरकर (राष्ट्रवादी)

  • प्रभाग क्र. ८ - लता रोडे (भाजपा)

  • प्रभाग क्र. ९ - प्रदीप तितीरमारे (कॉंग्रेस)

  • प्रभाग क्र. १० - प्रेरणा व्यास (राष्ट्रवादी)

  • प्रभाग क्र. ११ - निशा मोहरकर (राष्ट्रवादी)

  • प्रभाग क्र. १२ - संदीप भांडारकर (भाजप)

  • प्रभाग क्र. १३ - ज्योती निखाडे (अपक्ष)

  • प्रभाग क्र. १४ - अश्विन धरमसारे (भाजप)

  • प्रभाग क्र. १५ - सविता सोनवाने (भाजप)

  • प्रभाग क्र. १६ - अरमान धरमसारे (राष्ट्रवादी)

  • प्रभाग क्र. १७ - सचिन भैसारे (राष्ट्रवादी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com