
शिवरात्रीनिमित्त निघाला होता यात्रेला; अपघातात काळाने घातला घाला
जेवनाळा (जि. भंडारा) : महाशिवरात्रीनिमित्त यात्रेला जाण्याची तयारी करून घरून निघालेल्या तरुणाचा दुचाकी वरून नियंत्रण सुटल्याने रस्त्या लगत असलेल्या चिंचेच्या झाडावर धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना इसापूर गुरढा मार्गावर घडली. दिनेश रोशन बोरकर (वय २२) राहणार जेवनाळा असे तरुणाचे नाव आहे. (Bhandara Accident News)
चार दिवसांआधी पुणे वरून तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाची अप्रेंटिस करून तो गावात परतला होता. आज सकाळी १० वाजे दरम्यान महादेवाच्या यात्रेला जात आहे असे सांगत घरून निघाला होता.रस्त्यात मिळालेल्या मित्रांना सोडून देण्यासाठी तो इसापुरला गेला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.त्याच्या घातलेल्या बॅग मध्ये पूजा करण्याचे साहित्य असल्याचे दिसून आले.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिवारावर दुःखाचे पहाड कोसळले आहे. दिनेशच्या परिवारामध्ये आई वडील व मोठा भाऊ आहे.या अपघातात झालेल्या मृत्यू मुळे परिसरात दुःखद वातावरण निर्माण झाले आहे.