Bhandara : मंढईची रेलचेल; गोड-आंबट शौकीनांसाठी पर्वणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भंडारा : मंढईची रेलचेल; गोड-आंबट शौकीनांसाठी पर्वणी

भंडारा : मंढईची रेलचेल; गोड-आंबट शौकीनांसाठी पर्वणी

निलज बु. (जि. भंडारा) - दिवाळी सण उत्सव आनंद, दिव्यातील उजडणाऱ्या पणतीचा सण आहे. झगमगाट, रोषणाई आणि त्याचबरोबर ग्रामीण भागात सुरू होणाऱ्या मंडई उत्सवाचा सण म्हणजे दिवाळी. पाच दिवसांचा दिवाळी सण आटोपताच मंडई उत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. परिणामी, मोहाडी तालुक्यातील करडी व परिसरातील ग्रामीण भागात जत्रांचे वातावरण पहायला मिळते आहे. तस बघितलं तर दिवाळी उत्सवाची खरी मजा ही ग्रामीण आयोजित होणाऱ्या मंडई उत्सवाची असते. दिवाळी सण सुरू होताच ग्रामीण भागात मंडईला सुरुवात होत असते.

मंडईनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमामध्ये सर्वात जास्त संचाचा नाटकांना प्रेक्षकांची पहिली पसंती असते. त्याचबरोबर तमाशा, दंडार, गोंधळ, कव्वाली, आमदंगल आणी आंबट शौकीनांसाठी लावणीचा आड हंगामे आयोजित केली जातात. काही का असेना मंडई उत्सवामुळे कलावंतांना त्यापासून मोठया प्रमाणात उत्पन्न प्राप्त होते. महिनाभरापासून आयोजक मंडई उत्सवाचा कामाला लागत असतात. मंडई उत्सवाला डेकोरेशनची मागणी मोठया प्रमाणात असते. त्यामुळे महिनाभरापासून डेकोरेशन बुक केले जातात.

हेही वाचा: लसीकरणासाठी टिमवर्क म्हणून काम करा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस

मंडईला पाहुण्यांचे आदान-प्रदान होत असते नातलग एकमेकांना गावी मंडईनिमित्त का होईना, पण, भेटीगाठी होत असतात. मुलांपासून तरुण, मोठ्यांना मंडईचे खास आकर्षण दिसून येते. विशेष करून तरुण मुलामुलींना मंडई उत्सव मोठी पर्वणीच घेऊन येणारा ठरतो. मंडई मुलामुलींसाठी भावी जोडीदाराची निवळ करण्याचे केंद्रस्थानसुद्धा मंडईला ग्रामीण भागात विशेष असे महत्त्व दिसून येते.

दिवाळी सण सर्वांसाठी आनंद, उत्सवाचे आणि हर्षोल्लास घेऊन येणारा सण असतो आणि त्यात मंडई उत्सव ग्रामीण नागरिकांसाठी आनंदाची पर्वणीच घेऊन येणारा सण ठरत असतो. पंधरा ते वीस दिवस चालणाऱ्या मंडई उत्सवाची मजा काही वेगळीच असते, हे मात्र विशेष ग्रामीण भागात मंडईला विशेष महत्त्व असते.

सकाळ सत्रापासून आप्तस्वकियांचे येणे जाणे सुरू होते. विशेष म्हणजे सोयरिकांच्या कामांना विशेष प्राधान्य दिले जाते. दिवाळीचा फटाका फुटताच सुयोग्य वर-वधुंचा लग्नाचा बार उडविण्याचा बेत आखला जातो. त्या मंडईच्या बहाण्याने भेटीगाठी वाढविण्यावर भर दिला जातो; त्यातून मोठया प्रमाणात संबंध वाढीला लागतात. दरम्यान, या उत्सवाच्या माध्यमातून लाखोंची उलाढालसुद्धा होत असते.

loading image
go to top