vaccination | लसीकरणासाठी टिमवर्क म्हणून काम करा जिल्हाधिकारी षण्मुगराजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरणासाठी टिमवर्क म्हणून काम करा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस
लसीकरणासाठी टिमवर्क म्हणून काम करा

लसीकरणासाठी टिमवर्क म्हणून काम करा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस

वाशीम : जिल्ह्यात मानोरा तालुक्यात लसीकरणाचे प्रमाण सर्वात कमी आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग पूर्णपणे आजही गेलेला नाही. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट केव्हा येईल हे सांगता येणार नाही. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लस घेणे हा एकमेव उपाय आहे. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत तालुक्यातील पहिल्या डोससाठी पात्र असलेल्या व्यक्तींचे शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले. ९ नोव्हेंबर रोजी मानोरा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मानोरा तालुक्याचा कोरोना लसीकरण आढावा घेताना आयोजित सभेत षण्मुगराजन बोलत होते.

हेही वाचा: अमरावती : पदोन्नतीच्या मुद्यावर गाजली सिनेट सभा

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, प्रभारी तहसीलदार किर्दक, गटविकास अधिकारी पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. षण्मुगराजन म्हणाले, ज्या गावांचे लसीकरण प्रमाण कमी आहे, त्या गावांना विकास निधी व शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार नाही. यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर जाऊन प्रत्यक्ष झालेले लसीकरण आणि बाकी असलेल्या लसीकरणाबाबतची माहिती घ्यावी.

ज्यांचे अद्यापही लसीकरण करण्यात आलेले नाही, त्यांच्याशी संपर्क करून त्यांना लस घेण्यास सांगावे व त्यांनी लस घेतल्याची खात्री करावी. लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, अशा गावातील सरपंच व पोलिस पाटील यांनी पुढाकार घेऊन ३० नोव्हेंबरपर्यंत पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करावे. गावपातळीवर काम करणारे शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व आशा सेविकांनी गावातील पात्र व्यक्तींना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे.

loading image
go to top