राष्ट्रवादीच्या कारेमोरेंची आमदारकी धोक्यात, केंद्रीय निवडणूक आयोगानं मागवला खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP MLA Raju Karemore

NCP च्या कारेमोरेंची आमदारकी धोक्यात, केंद्रीय निवडणूक आयोगानं मागवला खुलासा

भंडारा : मोहाडी-तुमसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे (NCP MLA Raju Karemore) यांच्यामागील अडचणी संपत नसल्याचं दिसतंय. पोलिस ठाण्यातील वादात त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली. पण, आता चक्क त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. माजी आमदाराच्या तक्रारीची दखल थेट केंद्रीय निवडणूक आयोगानं (Election Commission) घेतली असून जिल्हाधिकाऱ्यांकडे खुलासा मागवला आहे.

हेही वाचा: राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांना अटक

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे उल्लंघन -

2019 च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत तुमसर क्षेत्रातून राष्ट्रवादीचे आमदार राजू माणिकराव कारेमोरे निवडून आले़ आहेत. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 नुसार लोकसेवक पद धारण केल्यानंतर लाभाचे पद किंवा शासनासोबत करारनामा करून कोणतेही लाभ मिळेल, असे कार्य करता येत नाही़. मात्र, आमदार राजू कारेमोरे यांनी स्वत:च्या नावे फर्म असलेल्या कंपनीसोबत 2019-20 व 2020-21 मध्ये शासनासोबत व्यवसाय करण्यासाठी धान भरडणी करण्याचा करारनामा केला़. नोटरी करताना पणन महासंघातर्फे जिल्हा पणन अधिकारी, शासनाकडून जिल्हा पुरवठा अधिकारी व आऱ. के़. राईस उद्योग मोहगाव देवी यांच्याकडून आमदार राजू कारेमोरे यांनी करार केला आहे़. या करारनाम्यानुसार 1 नोव्हेंबर 2019 ते 29 ऑक्टोबर 2020 च्या कालावधीत 1 लाख 94 हजार 166 क्विंटल तर 9 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 ला कालावधीत 27 हजार 336 क्विंटल धानाची उचल करून भरडाई केली आहे़. याची शासनस्तरावर स्पष्ट नोंद आहे. त्यामुळे आमदार राजू कारेमोरे यांनी शासनासोबत करार करून धान भरडणीचे कंत्राट मिळवून लोकप्रतिनिधीत्व अधिनियमाचे उल्लंघन केल्याचं स्पष्ट झाले आहे.

माजी आमदारानं केली तक्रार -

माजी आमदार व भाजपा नेते चरण वाघमारे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकड़े लेखी तक्रार केली आहे. राज्यपाल महोदयांनी माजी आमदार चरण वाघमारे यांच्या तक्रारीची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अहवाल मागविला़ असून आयोगाने देखील भंडारा जिल्हाधिकाऱ्यांकडून या तक्रारीसंबंधी शासकीय स्तरावरील कारवाईसंदर्भात तसेच करारनाम्यासंदर्भात खुलासा मागविला़ आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून करारनाम्यासंदर्भातील अहवाल निवडणूक आयोगाकडून कारवाईसाठी राज्यपालांकडे प्रकरण जाणार असल्याने यावर काय निर्णय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़.

करारनाम्यात आमदार राजू कारेमोरे यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख -

राज्यात धान खरेदी योजनेतंर्गत खरीप हंगाम 2019-20 तसेच रब्बी हंगाम 2020-21 मध्ये शासकीय आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेतंर्गत धानाची भरडणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याच्या उपस्थितीत 12 डिसेंबर 2019 ला समन्वय समितीच्या बैठक पार पडली़. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिलेल्या आऱ. के़. राईस उद्योग मोहगाव देवीचे राजू माणिकराव कारेमोरे यांच्यासोबत 28 फेब्रूवारी 2020 ला नोटरी करून करारनामा केल्याचे सिद्ध झाले़. या करारनाम्याप्रमाणे 1 नोव्हेंबर 2019 ते 29 ऑक्टोबर 2020 च्या कालावधीत 1 लाख 94 हजार 166 क्विंटल धानाची उचल करून भरडाई केली़. तसेच राज्यात विकेंद्रीत धान खरेदी योजनेतंर्गत खरीप हंगाम 2020-21 तसेच रब्बी हंगाम 2021-22 मध्ये शासकीय आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेतंर्गत खरेदी केलेल्या धानाची भरडणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 14 डिसेंबर 2020 ला समन्वय समितीच्या बैठक पार पडली़. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिलेल्या आऱ. के. राईस उद्योग मोहगाव देवीचे आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांच्यासोबत 24 डिसेंबर 2020 ला नोटरी करून करारनामा केल्याची नोंद आहे़. या करारनाम्याप्रमाणे 9 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 ला कालावधीत 27 हजार 336 क्विंटल धानाची उचल करून भरडणी केली आहे़. सदर करारनाम्यात आमदारांच्या मालकीच्या राईस मिलसोबत करार करण्यात आल्याचे सिद्ध झाल्याने कारेमोरे यांच्यावर कारवाई अटळ असल्याचे बोलले जात आहे. त्यांमुळे ऐन स्थानिक़ स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर आमदार राजू कारेमोरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NCP
loading image
go to top