एकाच कुटूंबातील 3 भावंडांचा तलावात बुडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dead body

एकाच कुटूंबातील ३ जणांना जीव गमवावा लागल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. मात्र, अत्यवस्थ असलेल्या तिघांना रूग्णालयात नेण्यापुर्वीच मृत्यू झाला होता.

एकाच कुटूंबातील 3 भावंडांचा तलावात बुडून मृत्यू

तुमसर : तुमसर गावाशेजारील तलावात आंघोळीसाठी गेलेल्या तीन भावंडांचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली.

सुंदरटोला गावात ही घटना घडली असून मृतांमध्ये ६ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
मुस्कान धनलाल सर्याम (वय ११ वर्ष), प्रणय धनलाल सर्याम (वय १२ वर्ष), सारिका छबीलाल सर्याम (वय ६ वर्ष) अशी मृत्यूमुखी पडलेल्या अल्पवयीन मुलांची नावे आहेत.

एकाच कुटूंबातील ३ जणांना जीव गमवावा लागल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. मात्र, अत्यवस्थ असलेल्या तिघांना रूग्णालयात नेण्यापुर्वीच मृत्यू झाला होता.

रविवारची सुट्टी असल्याने मुले आंघोळीसाठी गेल्याचे सांगण्यात येते. या दरम्यान त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते वाहून जात होते. दरम्यान, गावकऱ्यांचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पाण्याबाहेर काढण्यास सुरवात केली. तत्पुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामे केले आहेत.त्यांचे मृतदेह शवविच्छेदनाकरता तुमसर येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.