Bhandara Police Bribery Case : केस कमकुवत करण्यासाठी १० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; APIसह दोन पोलिसांवर गुन्हा

API and Constable Allegedly Demand ₹10,000 Bribe : भंडारा पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षकासह दोन पोलिसांवर १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bhandara Police Bribery Case

Bhandara Police Bribery Case

esakal

Updated on: 

भंडारा : तक्रारदाराविरुद्ध आलेल्या तक्रारीतील केस कमकुवत करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भंडारा पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. सापळा कारवाईदरम्यान आरोपींना कारवाईचा संशय आल्याने त्यांनी तक्रारदाराची भेट घेतली नाही. त्यानंतर ते दोघेही पसार झालेत.

या प्रकरणात भंडारा पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक रमेश संपतराव खाडे (वय ३८) आणि पोलिस शिपाई रवीकुमार बाबुराव आडे (वय ३८) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २४ सप्टेंबर २०२६ रोजी तक्रार प्राप्त झाली होती.

Bhandara Police Bribery Case
Yavatmal Bank ED Raids : थकबाकीदारांवर ‘ईडी’चा छापा महिला बँकेतील २४२ कोटींच्या घोटाळाप्रकरणी यवतमाळ, वणी येथे कारवाई

तक्रारदाराविरुद्ध भंडारा पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारीवरून प्रकरणातील केस कमकुवत करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद होते. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी पथकाने पडताळणी केली.

यावेळी पोलिस शिपाई रवीकुमार आडे याने तक्रारदाराशी प्रकरणाबाबत बोलणी केली. तसेच सहायक पोलिस निरीक्षक रमेश खाडे याच्यांशी मोबाइलवर संपर्क साधून प्रकरण आणि लाचेच्या रकमेसंदर्भात चर्चा केली.

दरम्यान, बुधवार, ३० सप्टेंबर रोजी दोघांवरही सापळा रचून कारवाई करण्याचे ठरले होते. मात्र, कारवाईचा संशय आल्याने दोघेही पोलिस तक्रारदाराला भेटले नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष लाचेची रक्कम स्वीकारण्याची कारवाई होऊ शकली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Shirur Police Constable Satish Mundhe Allegedly Accepts ₹95,000 Bribe
Satara Shahupuri Police Bribe Case
Raigad Zilla Parishad Yogesh Bhasme ₹1.5 lakh bribe
Pathardi Bribery Case
Marathi News Esakal
www.esakal.com