Yavatmal Bank ED Raids : थकबाकीदारांवर ‘ईडी’चा छापा महिला बँकेतील २४२ कोटींच्या घोटाळाप्रकरणी यवतमाळ, वणी येथे कारवाई

Babaji Date Women's Cooperative Bank Case Under Scrutiny : यवतमाळमधील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील २४२ कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने यवतमाळ आणि वणीतील नऊ ठिकाणी छापे टाकल्याची माहिती आहे.
Yavatmal Bank ED Raids

Yavatmal Bank ED Raids

esakal

Updated on: 

यवतमाळ : शहरातील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील थकबाकीदारांवर गुरुवारी (ता. १) सकाळपासून सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) छापासत्र सुरू आहे. यवतमाळ आणि वणी येथील नऊ थकबाकीदार छापा पडल्याची माहिती आहे. यात थकबाकीदारांच्या घरातील कर्ज प्रकरणाची कागदपत्रे तपासण्यात आली असून, या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

अवसायनात निघालेल्या बाबाजी दाते महिला बँकेच्या शेकडो सभासदांचे पैसे अद्यापही अडकलेलेच आहेत. तरीसुद्धा थकबाकीदार सभासद कर्जाचा भरणा करीतच नसल्याचे दिसून येते. यामुळे थकबाकीदार सभासद आता ‘ईडी’च्या रडारवर आले आहेत. गुरुवारी पहाटेपासून विविध पथकांनी वणी, यवतमाळ येथील थकबाकीदारांच्या निवासस्थानांसह अन्य ठिकाणी छापा टाकला.

Yavatmal Bank ED Raids
Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रक-पिकअपच्या धडकेत ५ जणांचा मृत्यू, २१ गंभीर जखमी

या पथकांनी कागदपत्रांची तपासणी केल्याची माहिती आहे. बँकेतील कर्जवाटप, कर्जखाती, तारण मालमत्तांचे मूल्यांकन, थकबाकी तसेच कर्जप्रकरणांशी संबंधित व्यवहारांची चौकशी केली जात असल्याची चर्चा आहे. या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

कारवाईदरम्यान कोणती कागदपत्रे किंवा इतर साहित्य ताब्यात घेण्यात आले याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु, थकबाकीदार सभासदांमध्ये एकच खळबळ उडाली असून, या कारवाईपासून बचावाचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. दिवसभर चाललेल्या छापासत्रामुळे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले होते. कारवाई पूर्ण झाल्यानंतर संबंधित यंत्रणेकडून अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Yavatmal Bank ED Raids
Sugar Prices: साखरेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! साठेबाजीला बसणार आळा; विक्रेत्यांना किती साखर साठवता येईल?

संचालक, व्यावसायिकांचा समावेश यवतमाळ शहरासह वणी येथील एकूण नऊ ठिकाणी पथकांकडून तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, कारवाईचा नेमका आवाका आणि ठिकाणांची संख्या अधिकृतरीत्या स्पष्ट झालेली नाही. आजच्या कारवाईत काही संचालक आणि मोठे व्यावसायिक असल्याची चर्चा दिवसभर होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com