अभिनंदनीय आनंदवार्ता! स्वच्छ सुंदर शौचालय अभियानात भंडारा देशात दुसरा

दीपक फुलबांधे
Wednesday, 30 September 2020

केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या वतीने १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम, सौंदर्यीकरण व देखभाल व्यवस्था या बाबींना प्रोत्साहित करण्यासाठी स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली होती.

भंडारा : दरवाजा बंद तो बिमारी कम! हा नारा देशस्तरावर देण्यात आला आणि पाहता पाहता चमत्कार झाला. स्वच्छ भारत आभियान हे संपूर्ण देशाचेच मिशन बनले. हे अभियान गावस्तरावर राबविले गेले. त्याचाच परिणाम म्हणजे केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ सुंदर शौचालय अभियानात भंडारा जिल्हा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.

लाखांदूर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या कन्हाळगाव ग्रामपंचायतीची देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकाने निवड झाली आहे. २ ऑक्‍टोबरला स्वच्छ भारतदिनी सकाळी १०.३० वाजता व्हर्चुअल कार्यक्रमाद्वारया ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्‍वरी एस. यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या स्वच्छ सुंदर शौचालय अभियानात स्वच्छतेच्या क्षेत्रात भंडारा जिल्ह्याने गगन भरारी घेतली आहे.

 

केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या वतीने १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम, सौंदर्यीकरण व देखभाल व्यवस्था या बाबींना प्रोत्साहित करण्यासाठी स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली होती.

ग्रामीण भागात शौचालयाचा नियमित उपयोग वाढविणे, गावस्तरावर स्वच्छता साधनांविषयीची स्वमालकीची भावना वाढविणे आणि सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम होऊन त्याची देखभाल होण्याच्या उद्देशाने राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वात हे अभियान राबविण्यात आले. या स्पर्धेमध्ये कन्हाळगाव ग्रामपंचायतीने सहभाग घेतला.

 

सविस्तर वाचा - अभिनंदनीय! खर्रा व दारूमुक्त गावासाठी पोलिस पाटलांचाच पुढाकार!

या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ सुंदर शौचालय अभियान आणि सामुदायीक शौचालय अभियानाच्या पुरस्काराची घोषणा केंद्र सरकारच्या वतीने नुकतीच करण्यात आली. कन्हाळगावने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. भंडारा एनआयसी सभागृहात जिल्हास्तरावर व्हर्चुअल कार्यक्रमाद्वारे जलशक्ती मंत्रालयाचे केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, रतनलाल कटारिया यांच्या उपस्थितीत या ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात येणार आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhandara is a second in swachha Bharat mission compitition