Bhandara ST Bus Incident
esakal
भंडारा : विद्यार्थिनींना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याची जबाबदारी असताना एसटी बसच्या चालक आणि वाहकाने त्यांना रात्रीच्या अंधारात अर्ध्या रस्त्यात उतरवल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा-मुंढरी मार्गावर घडला. बसमध्ये पुढे जाण्यासाठी अन्य प्रवासी नसल्याचं कारण देत दोन विद्यार्थिनींना रोहा गावातच खाली उतरवण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या कारभारावर आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.