Bhandara News: पेंच कालव्यात बुडून तरुणाचा मृत्यू २४ तासांनी सापडला मृतदेह; दारू अड्ड्यांविरोधात संताप
Bhandara drowning: भंडारा जिल्ह्यातील पेंच कालव्यात मद्यधुंद अवस्थेत पोहायला गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावकऱ्यांनी अवैध दारूविक्रीवर संताप व्यक्त केला.
शिवणी (भोंडकी) : किरणापूर येथील रितीक गजाम (वय १८) याच्या दारूच्या नशेत पेंच कालव्यात पोहायला जाणे जीवावर बेतले. शनिवारी (ता.१०) तो वाहून गेला होता, तर रविवारी (ता.११) दुपारी भंडारा जिल्ह्यातील कांद्री जवळील वासेरा गावाजवळ त्याचा मृतदेह सापडला.