esakal | भंडारा : विष घेतल्याने दोघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

भंडारा : विष घेतल्याने दोघांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भंडारा : वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी विष घेतले. त्यांचा मंगळवारी उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. राजकुमार प्रेमलाल राऊत (वय 28, रा. धानला) आणि ताराबाई सहादेव आठवले (वय 65, रा. खैरी तेलोता) अशी  मृतांची नावे आहेत.
अड्याळजवळील खैरी तेलोता येथील ताराबाई यांनी 24 ऑगस्टला घरी विष घेतले. त्यांचा मुलगा शेतातून आला तेव्हा तिची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे उपचारासाठी अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता कक्षात नऊ दिवसांच्या उपचारानंतर ताराबाई यांचा आज मृत्यू झाला.
तसेच मौदा (जि. नागपूर) जवळील धानला येथील राजकुमार राऊत याने मंगळवारी विष घेतले. त्यावेळी कुटुंबीय शेतात गेले होते. त्याची प्रकृती बिघडल्यावर उपचारासाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. परंतु, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मृताच्या कुटुबात आईवडील, पत्नी व दोन मुले आहेत. पोलिसांनी वैद्यकीय अहवालावरून घटनांची नोंद केली आहे.

loading image
go to top