Bhandara News: नुकतीच शाळा सुरु झाली अन् पहिल्याच्या वर्गातील विद्यार्थीनीचा शाळेत शॉक लागून मृत्यू

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भंडाऱ्यातील पुयार इथं जिल्हा परिषदेच्या शाळेत एका विद्यार्थींनीचा शॉक लागल्याने मृत्यू झाला आहे.
Bhandara News
Bhandara NewsEsakal
Updated on

नुकत्याच सुट्ट्या संपल्या आणि आता प्राथमिक शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे. १५ जूनला सर्वांच्या शाळा सुरू झाल्या. शाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसातच भंडाऱ्यात पहिलीतील विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळेत स्वच्छतागृहात गेल्यानंतर वीजेचा शॉक लागल्याने चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या यशस्वी सोपान राऊत हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील पुयार येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तिचा प्रवेश करण्यात आलेला होता. नुसतीच शाळा सुरू झाली होती. बुधवारी ३ जुलैला यशस्वी सकाळी शाळेत गेली. तेव्हा शाळेत लावण्यात आलेल्या ROच्या वायरचा करंट तिला लागला. यात ती स्वच्छतागृहातच बेशुद्ध होऊन पडली.

Bhandara News
Bhushi Dam: भुशी डॅम जवळ वाहून गेलेल्या कुटुंबासाठी प्रत्येकी 5 लाखांची भरपाई; अजित पवारांची घोषणा

घटनेची माहिती मिळाताच तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र, डॉक्टरांनी तिलं मृत घोषित केलं. शाळेला सुरुवात होऊन काहीच दिवस झाले असतानाच मृत्यू झाल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Bhandara News
Hathras Stampede: हाथरस दुर्घटनेत कटाचा संशय! मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली होणार चौकशी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.