Bharat Jodo Yatra : खा. राहुल गांधीच्या स्वागताची तयारी जय्यत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Jodo Yatra

Bharat Jodo Yatra : खा. राहुल गांधीच्या स्वागताची तयारी जय्यत

वाशीम : काॅग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज (ता.१५ ) वाशीम जिल्ह्यात दाखल होत आहे. विदर्भ मराठवाड्याची सिमारेषा असलेल्या पैनगंगा नदीच्रा तिरावर वाशीम जिल्हा काँग्रेस कमेटीकडून या यात्रेचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.

काँग्रेस नेते राहूल गांधी हे कन्याकुमारी ते काश्मीर अशा मार्गाने भारत जोडो यात्रा घेवून येत आहेत. मराठवाड्यातील यात्रेच्या प्रवासानंतर मंगळवारी( ता.१५ ) ही यात्रा जिल्ह्य़ात प्रवेश करीत आहे. या यात्रेच्या स्वागतासाठी जिल्हा काँग्रेस कमेटीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. निजाम स्टेट व पी.सि अॅन्ड बेरार प्रांताची ऐतिहासिक सिमारेषा असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावर भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. ही यात्रा राजगाव मार्गे वाशीम शहरात दाखल होणार आहे. वाशीम शहरात पोलिस ठाणे चौकात दुपारी तीन वाजता राहूल गांधी यांची काॅर्नर सभा होणार आहे. त्यानंतर ही यात्रा रामराव सरनाईक समाजकार्य विद्यालयाच्या प्रांगणात मुक्कामी राहणार आहे.

या यात्रेच्या स्वागताला जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आमदार अमित झनक, प्रांत अध्यक्ष नाना पटोले, आमदार कुणाल पाटील, राज्य युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत, माजी मंत्री मानिकराव ठाकरे, अॅड दिलीपराव सरनाईक, बलदेव महाराज, तातु देशमुख, दिलीप भोजराज, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चक्रधर गोटे, यांची उपस्थिती राहणार आहे.